आपला बीड जिल्हाआपले केजशेतकरी

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका !

शॉक लागून बैल दगावल्या प्रकरणी व बियाणे न उगवल्या प्रकरणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश

वादळवार्ता वार्तांकन – केज

केज तालुक्यातील येथील युसुफवडगाव येथील एका शेतकऱ्याचा वीज वाहक तार तुटून ती बैलाच्या अंगावर पडल्याने शॉक लागून बैल दगावल्या प्रकरणी आणि दुसऱ्या एका घटनेत सोयाबीनचे बियाणे उगवल्या प्रकरणी झालेल्या नुकसानीपोटी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संबंधितांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. १० डिसेंबर २०१९ रोजी केज तालुक्यातील युसुफवडगाव येथील बाळा रामभाऊ निकम यांच्या शेतातून गेलेल्या वीज वाहिनीची विद्युत वाहक तार तुटून ती बैलाच्या अंगावर पडली त्यात तो बैल दगावला त्यामुळे त्यांचे नुकसान झाले त्यामुळे त्यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे नुकसान भरपाईसाठी ॲड. हनुमंत जाधव यांच्या मार्फत दादा मागितली होती. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आणि उपलब्ध कागदपत्रे व पुराव्या आधारे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीमती मेघा गरुड व सदस्य श्रीमती अपर्णा दिक्षीत आणि श्रीधर कुलकर्णी यांनी त्या शेतकऱ्यास ५० हजार रु. नुकसान भरपाई आणि आर्थिक व मानसिक त्रासापोटी ३ हजार रु व दाव्याच्या खर्चापोटी २ हजार रु असा ५५ हजार रु. अशी नुकसान भरपाई देण्यात यावी. असा आदेश दिले आहेत. तसेच निकाल लागल्या पासून नुकसान भरपाईची रकमेवर ८ टक्के दराने व्याज देण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच दुसऱ्या प्रकरणात युसुफवडगाव येथील सन २०२० च्या खरीप हंगामासाठी किरण आत्माराम जावळे आणि आशिष आत्माराम जावळे या दोन भावांनी केज येथील संतोष कृषी सेवा केंद्रातून ग्रीन सिड्स कंपनीचे ३३४४ वाणाचे १३ बॅग सोयाबीन ज्याची किंमत ३२ हजार ८२ रु. चे सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. त्यांनी पूर्व मशागत करून पेरणी केली. परंतु ते बियाणे व्यवस्थित उगवले नाही. म्हणून त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.

त्या बाबत त्यांनी ग्रीन सिड्स बियाण्याची कंपनी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि सदर बियाणे खरेदी केलेल्या कृषी सेवा केंद्राला कळविले. या बाबत त्यांनी ॲड. हनुमंत जाधव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार क्र. २०५/२०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून व उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीधर कुलकर्णी व सदस्य श्रीमती मेघा गरुड, श्रीमती अपर्णा देशमुख यांनी असा आदेश दिला आहे; की, सदर ग्रीन सिड्स कंपनीने तक्रारदाराला ५ लाख ३४ हजार ८२५ रु. नुकसान भरपाई द्यावी. तसेच आर्थिक व मानसिक त्रासापोटी ५ हजार रु. आणि दाव्याच्या खर्चापोटी एक हजार रु. नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निकाल लागल्या पासून नुकसान भरपाईची रकमेवर ८ टक्के दराने व्याज देण्याचे आदेश दिले आहेत.

या दोन्ही निकालामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून बियाणे उत्पादक कंपनी व वीज वितरण कंपनीला चपराक बसली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!