आपला बीड जिल्हा

बीड जिल्हा परिषद चे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर: एकूण 22 जणांची निवड

 

जिल्हा परिषदेच्या वतीने यावर्षी दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.जिल्ह्यातून अकरा प्राथमिक, दहा माध्यमिक आणि एका विशेष शिक्षकाचा गौरव करण्यात येणार आहे.

वादळवार्ता वार्तांकन बीड – गणेशभाऊ ढाकणे

बीड जिल्हा परिषदेने यावर्षी सीईओ अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारासाठी निवड समिती गठीत केली होती.या समितीने जिल्ह्यातील अर्ज केलेल्या शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या.

त्यानंतर जिल्ह्यातून या बावीस शिक्षकांची आदर्श शिक्षक म्हणून निवड केली आहे.

यामध्ये सय्यद हशमोद्दीन अंबाजोगाई,लाड गोरक्षनाथ आष्टी,उशाबाई ढेरे बीड,गणेश नरके धारूर,भगवान फुंदे गेवराई,धम्मदीपा दरबारे केज,पाचनकर सुनंदा माजलगाव,सौदागर कांदे परळी,अण्णासाहेब खंडागळे पाटोदा,सुभाष सांगळे शिरूर,सुवर्ण सुतार वडवणी यांना प्राथमिक विभागातून तर संजय तांदळे अंबाजोगाई,संजय कोळी आष्टी,रवींद्र देवगावकर बीड,चांदबा वाघमारे धारूर,विष्णू साळुंके गेवराई,रामकृष्ण भारती केज,बाळासाहेब सोनसळे माजलगाव,पठाण इमरान परळी,विजयकुमार साळुंके पाटोदा,राम वाघूम्बरे शिरूर यांना माध्यमिक विभागातून तसेच अमोल शिंदे आष्टी यांची विशेष शिक्षक म्हणून पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!