आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक

राष्ट्रीय महामार्ग नाल्याविना ; रस्त्याला आले तळ्याचे स्वरूप ; प्रभाग क्रमाक ७ मधील नागरीकांचे हाल

तलावातील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डेंग्यु सद्श्य आजार होण्याची भीती ?

जलमय रस्त्यामुळे आपघात झाला तर ?

वादळवार्ता/केज

पाटोदा ते अहमदपुर या राष्ट्रीय महामार्गाचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रुंदीकरण व मजबुतीकरणाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली असुन सदरील रस्त्याच्या कामामध्ये स्टिलचा वापर केला नसल्यामुळे रस्ते जागो-जागी खचत आहेत तर भेगा, तडे , चिरा गेल्या असल्यामुळे रस्त्यावरती आपघाताचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढलेले आहे त्यातच केज शहरामध्ये चक्क नाल्याचे काम न करताचा रस्त्याचे ढिसाळ काम केले आहे. रस्त्याच्या बाजुने नाला न केल्यामुळे पाउसाचे पाणी प्रभाग क्र.७ मधील स्वागत हॉटेलच्या पश्चिम बाजुस एकत्र झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठा संकटातुन अडथळा पार करत करत पाण्यामधुनच वाहने चालवावी लागत आहेत. तसेच प्रभाग क्रमाक ७ मधील नागरीकांना या तलावातुनच मार्ग काढत मुख्य रस्त्याला यावे लागत आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे.

सदरील तलावाचा दुर्गंधीयुक्त वास येत असुन त्यावर मच्छारांचे प्रमाण वाढलेले आहे . एकीकडे वैद्यकीय टिमने केज नगरपंचायतला धुर फवारणीचे आदेश दिलेले असताना दुसरीकडे मात्र या दुर्गंधी तलावाची व्यवस्था केज नगरपंचायत करत नसल्यामुळे प्रभाग क्रमांक ७ मधील रहिवाशी केज नगरपंचायतच्या अविकासावर नाखुश असुन डेंग्यु सद्श्य आजारामुळे भयभीत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सदरील रस्ताचे काम केज शहरातुन आबडधोबड होत असताना केज नगरपंचायत वा प्रशासन त्यावेळी काय करत होते ? ज्यांनी रस्त्याचे काम केले त्या HPM कंपनीचे देवळे तथा रवि कुमार यांच्यावर केज नगरपंचायत कारवाई करेल का ? या तलावामुळे रस्त्यावर आपघात झाला किवा मच्छरामुळे डेंग्यु सद्श्य आजारामुळे एखद्याचा बळी गेला तर याला जिम्मेदार कोण ? आदि प्रश्न रस्त्यावरून ये-जा करणाऱ्याला तसेच प्रभाग क्रमांक ७ मधील नागरीकांना पडले आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!