वादळवार्ता – गौतम बचुटे
नातू आजारी असल्यामुळे घराची व जनावरांची देखभाल करण्यासाठी रोजंदारीने ठेवलेल्या इसमाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने घरातील ४५ हजार रु. चोरून नेले.
या बाबतची माहिती अशी की, मुंडेवाडी येथील दत्तात्रय चांगदेव मुंडे यांच्या मुलीचा दोन वर्षांचा मुलगा म्हणजे त्यांचा नातू हा आजारी असल्याने तो बीड येथील दवाखान्यात ॲडमिट असल्यामुळे दत्तात्रय मुंडे व त्यांची पत्नी हे ते बीड येथे दवाखान्यात गेले होते. ते बाहेरगावी जात असल्याने त्यांनी घरी लक्ष देऊन जनावरांची देखभाल करण्यासाठी दादासाहेब बाबासाहेब मुंडे याला ५०० रु. रोजंदारीने ठेवले. त्या पोटी त्यांनी त्याला १५०० रु. देखील रोख दिले. दत्तात्रय मुंडे यांनी बीड येथे जात असताना त्यांनी त्यांच्या दोन म्हशी विकून त्याचे आलेले ४५ हजार रु. घरात ठेवले होते. दरम्यान ते दवाखान्यात असताना त्यांचा भाऊ बाळु मुंडे यांनी त्यांना फोन वरून सांगितले की, त्यांनी देखरेखीसाठी ठेवलेला दादासाहेब मुंडे व त्याचा साथीदार राहुल घोळवे हे दोघे ५०० रू. च्या नोटा मोजत असताना त्याने पाहिले. त्या नंतर दत्तात्रय मुंडे यांनी त्यांचा भाऊ बाळू मुंडे यास घरात ठेवलेले पैसे जाऊन पाहून येण्यास सांगितले. बाळू मुंडे यांनी घरात पाहिले असता त्यांना पैसे आढळून आले नाही. त्याने ही माहिती त्यांचे भाउ दत्तात्रय मुंडे यांना दिली.
त्या वरून दत्तात्रय मुंडे यांच्या तक्रारी वरून दि.२१ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात दादासाहेब मुंडे व त्याचा साथीदार राहुल घोळवे यांच्या विरुद्ध गु. र. नं. ५६४/२०२३ भा. दं. वि. ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूरघाट दूरस्थ पोलीस चौकीचे स.पो.उ.नि. जसवंत शेप हे पुढील तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!