दैनिक वादक वार्ता/केज
केज शहरामध्ये जवळपास ३५००० हजार लोकसंख्या आहे . यासाठी दोन आठवडी बाजार भरले जातात त्यामध्ये एक शुक्रवारचा पंचायत समिती मैदानात तर दुसरा मंगळवारचा मंगळवार पेठेत भरतो त्या बाजारासाठी केज तालुक्यातून शेतकरी मोठया संख्येने बाजारात येतात .पाठीमागील कित्येक दिवसांन पासुन केज शहरामध्ये याच आठवडी बाजारामधुन अनेक बाजारासाठी आलेल्या नागरीकांचे मोबाईल चोरण्याच्या घटना घडत होत्या,आहेत . मात्र पोलिस प्रशासन कोणत्याही चोरास पकडण्यात अयशस्वी होत होते अनेक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी, अधिकारी असताना मात्र एकही मोबाईल चोर पोलिसांच्या हाताला न लागन्याचे कारण काय ? असा केज शहरातील जनतेत सवाल पडलेला असताना आज दि .२३ जुलै २०२४ वार मंगळवार रोजी एका तरुण मुस्लिम युवकामुळे वा त्याच्या तत्परतेमुळे महिला मोबाईल चोर पकडण्यात आल्या आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि आज शहरातील भरगच्च भरलेला आठवडी बाजार त्यामध्ये लोकांची तुफान गर्दी आज सकाळी साधारण ११ ते १२ दरम्यान अजीज पुरा येथील एकाचा मोबाईल बाजारामध्ये चोरीला गेला होता त्यांच्या बाजुसच राहणाऱ्या सय्यद अल्ताफ ( गौस ) वय २४ वर्षाच्या तरुणाला हि गोष्ट कळाली तो मोबाईल चोर पकडण्यासाठी बाजारामध्ये फिरत असता वा त्याचा शोध घेत असता एक महिला दुसऱ्या बाजारासाठी आलेल्या महिलेच्या पर्समध्ये हात घालताना त्या युवकास दिसली असता. त्याने तात्काळ त्या महिलेजवळ जाऊन तिला मोबाईल चोरताना पकडले व तुझ्या सोबत आणखी कोण कोण आहे ? तिला विचारले असता तिने सुरुवातीला कांहि सांगितले नाही परंतु पोलिस ठाण्यात नेईल असे सांगताच त्या महिलेने माझ्यासोबत आणखी ३ महिला आहेत असे सांगितले व त्या महिला केज बसस्टॅन्ड जवळ बसुन आहेत असे सांगताच बसस्टॅन्ड जवळ गेल्यानंतर त्या महिलांच्या पिशवीमध्ये दोन मोबाईल आढळून आले. त्या मधील एक महिलाने पलायन केले तर तीन महिलाना केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले . या जरी तीन महिला पकडल्या असल्या तरी यांचे मोठे रॅकेट कार्यान्वीत असण्याचे जनतेमध्ये तर्क वितर्क लावले जात असुन केज पोलिस ठाण्यामधील प्रशासन कारवाई करणार का ? मोबाईल चोरांचे रॅकॅट उघडकीस येणार का ? मोबाईल चोरावर कारवाई होणार का ? आदि प्रश्न केज शहरातील जनतेमध्ये पडले आहेत. मात्र केज शहरातील युवकाच्या कर्तव्यदक्ष पणे केलेल्या कामगीरीचे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!