वादळवार्ता/केज
केज येथील बीड जिल्हयातून सर्वाधिक उसाचा भाव देणारा येडेश्वरी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मधील गाळपास आलेल्या उसाचे बील प्रथम हप्ता रू.२४५०/- ने अदा केलेले आहे व त्यानंतर द्वितीय हप्ता रू.१००/- ने अदा केलेला आहे. विजयादशमी सणानिमीत्त कारखान्याने रू.१००/- प्रती टनाप्रमाणे तिसरा हप्ता शेतकऱ्यांना दिलेला आहे. कारखान्याने असे एकूण रू.२६५०/- प्रती टनाप्रमाणे शेतकऱ्यांना उस बील अदा केलेले आहे. यावरून येडेश्वरी साखर कारखान्याने हंगाम २०२२-२३ मध्ये शासनाने ठरवलेल्या एफ. आर.पी पेक्षा रू.१५०/- ने जास्त भाव दिलेला आहे.अशाप्रकारे बीड जिल्हयातून येडेश्वरी साखर कारखान्याने उसाला सर्वाधिक उच्चांकी भाव दिलेला आहे. तसेच येडेश्वरी साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. येडेश्वरी साखर कारखाना शेतकऱ्यांचे हित जोपासणारा कारखाना ठरत आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चालू हंगामात देखील येडेश्वरी साखर कारखान्यास उस गाळपास द्यावा.येडेश्वरी साखर कारखान्याने शेतकरयांना एफआरपी पेक्षा जास्त भाव देऊ असे आवाहन येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांनी दिले होते. व दिलेला शब्द पाळणारे शेतकरीपुत्र बजरंग बप्पा सोनवणे यांनी एफआरपी पेक्षा १५० रूपये भाव जास्त देऊन शेतकऱ्यांची दसरा दिवाळी गोड केली आहे .
येडेश्वरी कारखान्याने शेतकरयांना दुष्काळ परीस्थित दीलासा देण्यचे काम आज पर्यंत केले आहे व यापुढेही शेतकरयांचा कारखाना,शेतकऱ्यांची चिंता, शेतकऱ्यांचे हीत जोपासनारा कारखाना म्हणजे येडेश्वरी साखर कारखाना आहे तरी यापुढे येडेश्वरी कारखान्याला जास्तीत जास्त प्रमाणात ऊस गाळप करण्यासाठी द्यावा अशी चर्चा सत्र जिल्ह्यातील, तालुक्यातील नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे व शेतकऱ्यांचा मनातील आनंद गगनात मावेनासा झाला आहे
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!