आपला बीड जिल्हा

नापिकीला कंटाळून केज तालुक्यात शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यात नांदूरघाट येथे ३५ वर्षीय युवकांने नापिकीला कंटाळून आणि वडिलांच्याकडे असलेल्या कर्जाच्या विवंचनेतून नदी पत्रातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील संजय त्रिमुखे वय ३५ वर्ष या विवाहित तरुणाने सततच्या नापिकी आणि त्याच्या शेतकरी असलेल्या राजाराम त्रिमुखे वडिलांच्या नावे असलेल्या कर्जाला कंटाळून गुरुवार दि. ३ नोव्हेंबर रोजी नदी पात्रातील बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

माहिती मिळताच पोलीस नाईक अशोक मेसे आणि रशीद शेख हे घटनास्थळी पोहोचले.

संजय त्रिमुखे यांच्या पाश्चात आई वडील, पत्नी आणि एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!