आंदोलनआपला बीड जिल्हाआपले केज

केज तहसील समोर अन्नत्याग आंदोलन

वादळवार्ता -गौतम बचुटे

स्व. साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आत्महत्येच्या स्मरणार्थ केज येथे प्रा. सुशीलाताई मोराळे आणि स्वाभिमानाचे ॲड कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे यांच्या कुटुंबाने शेती परवडत नाही म्हणून ३७ वर्षां पूर्वी आत्महत्या केली होती. ती शेतकरी आत्महत्या ही पहिली शेतकरी आत्महत्या समजली जाते.

त्यांच्या स्मरणार्थ दि.१९ मार्च केज तहसील कार्यालया सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुशीलाताई मोराळे आणि स्वाभिमानाचे ॲड. कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली किसान संघर्ष समिती, शेतकरी संघर्ष समिती व ग्रामीन युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमान अन्नदात्यांसाठी एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या अन्नत्याग उपोषणात विजयकुमार हांगे, प्रा. बबनराव आंधळे, श्रीकांत चौरे, राजेंद्र दराडे, देविदास चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!