स्वामी विवेकानंद विद्या मंदिरात गणेशोत्सवानिमित्त रंगले कवी संमेलन
अंगावरती कोणी येता
तू कावा उधळून लाव
रणचंडी हो तु आता
पाप्यावरती घाली घाव…!
– जयश्री ताई कोकीळ
वादळवार्ता वार्तांकन – केज
केज शहरातील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर (माध्यमिक विभागात) गणेशोत्सवानिमित्त विविध विषयांना स्पर्श करीत स्थानिक कवींचे कवी संमेलन रंगले.
या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी निसर्ग कवी अनिल गव्हाणे हे होते तर प्रमुख उपस्थिती जिवन विकास शिक्षण मंडळाचे सचिव जी.बी.गदळे हे होते.
कवयिञी जयश्री ताई कोकीळ यांनी तरुणींनी समाजात जागरुक राहण्याचे आवाहन केले. त्या म्हणतात..
अंगावरती कोणी येता
तू कावा उधळून लाव
रणचंडी हो तू
पाप्यावरती घाली घाव..!
कवी अनिल गव्हाणे यांनी मी कसा कवी झालो यावर विस्तृत विवेचन करुन कवितेचे गायन केले. ते म्हणतात…
घन जिवांचे जीवन
घन भूमीचृ भरणं
शेत मातीचे सृजन
बळी राजाचे भुषण..!
या नंतर शेतकरी बापाची संवेदना मांडतांना डॉ.बी.जे.हिरवे यांनी बाप कवितेतुन व्यथा मांडली…
सर्व पाखरं उडतात
घरटे माञ सुने होते
जगाच्या मायाजाळात
सर्व काही उणे होते..!
कवयिञी सिमा ताई गुंड यांनी बाल कवितेचा चिलबिलाट निर्माण केला…
वांगोबाची वरात
मामाच्या मळ्यात
करवली मिरची
मोठ्या तोऱ्यांत..!
जेष्ठ कवी माणिकराव आनंदगांवकर यांनी पुर्ण स्वातंञ्याची कविता सादर करुन ग्रामिण व शहरी प्रश्नांना स्पर्श केला.
कवी हनुमंत घाडगे यांनी तरुणातील नैराश्याबद्धल व्यक्त होतांना सांगितले…
गांवा गांवातुन
बिना लग्नाची वळूगत फिरत्यात पोरं..
आई बापाच्या जीवाला
नवश्या पोराचा घोर..!
प्राचार्य डॉ.हनुमंत घाडगे यांनी खुमाशदार शैलीत संचलन करत तिरकस मांडले.
या कार्यक्रमात जिवन विकास शिक्षण मंडळाचे सचिव जी.बी.गदळे,मुख्याध्यापक गोपाळघरे सर उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!