आपला बीड जिल्हा

होळजवळ जीपचा अपघात ; नीटच्या परिक्षेला जात असलेले पाच विद्यार्थी जखमी

जखमींना उपचाराकरिता अंबाजोगाई रुग्नालयात दाखल करण्यात आले

 

वादळ वार्ता – वार्तांकन – महादेव काळे

==================================

केज-अंबाजोगाई रोडवर होळ जवळ लातूर येथून बोलेरो जीपमध्ये नगर येथे नीटच्या परिक्षेसाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या बोलेरो जिपला अंबाजोगाई -केज महामार्गावरील होळ जवळ अपघात होवुन जीप पलटी झाली असुन ती रस्त्याच्या खाली पडून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक १५ रोजी अहमदनगर येथे नीटच्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना घेवुन जाते त असलेल्या एका बोलेरो जिपला केज तालुक्यातील केज अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला असुन या अपघातात पाच जण जखमी झाले असून या जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.या अपघातातील जखमी हे पाथर्डी येथील आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील सिरसाट कुटुंबातील मुले लातूर येथे क्लासेस लावून नीटची तयारी करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन ते अहमदनगर येथे नीटचा पेपर असल्याने पालक बोलेरो जीप घेऊन मुलांना परिक्षेला घेऊन जाण्यासाठी लातूर येथे आले होते.

लातूर येथून मुलांना घेऊन नगरकडे जाताना केज तालुक्यातील होळच्या पुढे जाताच बोलेरोचा अपघात झाला. यामध्ये सौरभ सिरसाट,सुजित सिरसाट, सुरेश सिरसाट,विनोद सिरसाट अन्य एक असे पाच जण जखमी झाले आहेत.अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णवाहिका येताच उपस्थितांनी मदत करत जखमींना अपघातग्रस्त जीपच्या बाहेर काढून रुग्णवाहिकेत बसवून उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात पाठवून दिले.

अपघात कसा घडला ? हे समजु शकले नाही.परंतु जीप रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झालेल्या अवस्थेत आहे. नागरिकांनी मदत केल्यामुळे अपघात ग्रस्तांना लवकर वैद्यकीय मदत मिळु शकली .

सोबत फोटो..

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!