फवारणी का करतोस ? म्हणून पुतण्याने मोडला हात ; गुन्हा दाखल
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यात कोरेगाव येथे शेतातील बांधावर तण नाशकाची फवारणी करणाऱ्या चुलत्याचा हातावर काठी मारून हात फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वा. च्या सुमारास कोरेगाव ता. केज येथील सगजनी नावाच्या शेतात अंकुश मारुती तांदळे हे त्यांच्या शेतातील बांधावर तणनाशकाची फवारणी करीत होते. त्या वेळी त्यांचा पुतण्या बालासाहेब पांडुरंग तांदळे हा अंकुश यास म्हणाला की, तु फवारणी कशाला करतो? तेव्हा अंकुश तांदळे त्यांना यात तुमचा काय संबंध काय आहे. असे म्हणाले असता अंकुश तांदळे याला त्याचा भाऊ पांडुरंग मारुती तांदळे आणि भावजई मीराबाई पांडुरंग तांदळे यांनी शिवीगाळ करुन बघुन घेवु; अशी धमकी दिली. तेवढ्यात अंकुश तांदळे याचा पुतण्या बालासाहेब पांडुरंग तांदळे याने त्याच्या हातातील निलगीरीच्या झाडाच्या काठीने अंकुश तांदळेला डाव्या हातावर काठ्या मारुन त्याचा डावा हात मनगटा जवळ फ्रॅक्चर करुन जखमी केले आहे.
या प्रकरणी अंकुश तांदळे यांच्या तक्रारी वरून दि २८ ऑक्टोबर रोजी बालासाहेब पांडुरंग तांदळे, पांडुरंग मारुती तांदळे आणि मीराबाई पांडुरंग तांदळे या तिघांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. न. ४९४/२०२२ भा. दं. वि. ३२६, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!