आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

दारुड्याने केली एसटीच्या ड्रायव्हर व कंडक्टरला अश्लील शिवीगाळ व धक्काबुक्की

वादळवार्ता – गौतम बचुटे

केज येथे एका दारुड्या इसमाने एसटीच्या ड्रायव्हर व कंडक्टरला शिवीगाळ व धक्काबुक्की केली.

या बाबतची माहिती अशी की, दि. ११ ऑगस्ट रोजी कळंब-केज-कळंब (एम एच-२०/बी एल-०५८७) या शट्टल सेवेच्या गाडीत कळंब येथील बस स्टॅंड वरून एक ओंकार नागनाथ मोदी नावाचा दारु पिलेला इसम चढला. त्याने केजल बस स्टँडवर बस आल्या नंतर महिला कंडक्टरने त्यांना गाडीच्या खाली उतरण्याची विंनती करूनही तो खाली उतरला नाही. पुन्हा कळंबला जाण्याचे तिकीट घ्या; अशी विंनती महिला कंडक्टरने केली असता त्याने महिला कंडक्टरला शिवीगाळ केली. तसेच त्याने ड्रायव्हर कैलास वचिष्ठ घाडगे व कंडक्टर या दोघांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून ड्रायव्हर वचिष्ट घाडगे यांच्याशी झोंबाझोंबी करून धक्काबुक्की केली.

या प्रकरणी कळंब-केज-कळंब या गाडीचे एसटी ड्रायव्हर वचिष्ट घाडगे यांच्या तक्रारी वरून ओंकार मोदी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस जमादार सचिन अहंकारे हे करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!