आपला बीड जिल्हा

मानव विकास संरक्षण समितीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी दशरथ चवरे तर जिल्हा उपाध्यक्ष सनी शेख यांची निवड….

वादळवार्ता – बीड

केज तालुक्यात सर्व परिचीत असलेले दै हिंद जागृतीचे केज तालुका प्रतिनिधी दशरथ चवरे यांची मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजिस्टर भारत सरकारच्या बीड जिल्हाध्यक्ष व युवा पत्रकार महेबूब (सनी) शेख यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मानव विकास संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी कुराडे साहेब यांच्या आदेशावरून HR डिपार्टमेंटचे प्रवीण गायकवाड साहेब व बीड जिल्हा अध्यक्ष मुस्तफा पठाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली दशरथ चवरे व सनी शेख यांची मानव विकास संरक्षण समितीच्या केज,परळी या दोन विधानसभा मतदारसंघासाठी निवड करण्यात आली आहे.

निवडी नंतर दशरथ चवरे व सनी शेख यांनी मानव विकास संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी कुराडे साहेब व जिल्हाध्यक्ष मुस्तफा पठाण सर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात काम करेन व मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजिस्टर भारत सरकारचे

संपूर्ण नियम अटीचे काटेकोर पणे पालन करीन व जनमानसाच्या हिताचे, जनमानसाची फसवणुक करणाऱ्या, भ्रष्टाचार करणारे, महिला अत्याचार विरोधी जनआंदोलन करून जनमाणसाला न्याय मिळवून देण्यासाठी सदयव प्रयत्नशील असेल व समाज जागृत करून या पदावर जबाबदारीने काम करीन या पदाचा कुठलाही गैर वापर करणार नाही सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत दशरथ चवरे व सनी शेख यांनी व्यक्त केले आहे.

या निवडीनंतर जिल्ह्यातुन मित्र परिवारा कडून अभिनंदन केले जात आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!