क्राईम

अपहरण करून २५ लाख रु खंडणी मागणार्‍याच्या  पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

खंडणीखोर गुन्हेगार केज येथे तृतीयपंथी सोबत राहात होता !

केज /गौतम बचुटे

जालना जिल्ह्यातील एका वीटभट्टी मालकाचे २५ लाख रु. च्या खंडणीसाठी अपहरण करून खंडणी न दिल्यास कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिलेल्या अपहरणकर्त्या पैकी एका गुन्हेगाराला केज पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. २९ मार्च रोजी केज येथील फुले नगर येथून ताब्यात घेतलेला आरोपी आकाश घुगे आणि त्याचे साथीदार यांनी दिनांक २२ मार्च रोजी रात्री ३:३० वा. च्या सुमारास जालना जिल्ह्यातील धानोरा येथील वीटभट्टी मालक निवृत्ती रामभाऊ तांगडे हे घरा बाहेर झोपलेले असताना त्यांचे चौघांनी एका पांढऱ्या रंगाच्या विनानंबरच्या स्कॉर्पिओ मधून अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. निवृत्ती तांगडे यांना मधल्या सीटवर बसवून त्यांच्या बाजूला दोघेजण बसले होते. स्कॉर्पिओ गाडी मंठा जालना रोडवरील डुकरी पिंपरी टोल नाक्याच्या समोर आणुन अंधारात थांबवली. त्या नंतर अपहरणकर्त्यांनी निवृत्ती ता तांगडे यांच्या पँटच्या खिशातील पंधरा हजार रुपये बळजबरीने काढुन घेतले आणि म्हणाले की, खंडणी म्हणुन २५ लाख रुपये द्यावे लागतील. नाही तर तुला व तुझ्या परीवाराला ठार मारुन टाकु. असे म्हणुन त्यांनी स्कॉर्पिओ गाडी ही घोडेगाव पाटी येथे थांबवुन तांगडे याला गाडी खाली उतरवले. तसेच जर आरडा ओरडा केला किंवा कोणाला माहिती दिली तर मारुन टाकु. असे म्हणुन ते चारही अनोळखी अपहरणकर्ते गाडीत बसुन निघुन गेले. पुन्हा दुपारी ३:३० वा. च्या सुमारास तांगडे यांना अनोळखी मोबाईल क्रमांका वरून फोन आला आणि सांगितले की, आम्ही सांगतो त्या ठिकाणी पैसे आणून दे. नाही तर परिवाराला मारून टाकण्याची धमकी दिली.

या नंतर दि. २२ मार्च रोजी निवृत्ती तांगडे यांच्या तक्रारी नुसार जालना जिल्ह्यातील मौजपुर पोलीस ठाण्यात त्या अनोळखी अपहरणकर्त्या विरुद्ध गु. र. नं. ६२/२०२५ भा. न्या. सं. ३५१(२), ३५१(३), ३०९(४), १४०(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे तपास करीत होते. मात्र सर्व आरोपी फरार झाले होते.

केज पोलिसांनी आरोपीला असे घेतले ताब्यात : मौजपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी संपर्क साधून आरोपींचा तपास घेण्याची माहिती दिली सदर आरोपी हा केजमध्ये असल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या आदेशा नुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी आणि पोलीस नाईक प्रकाश मुंडे यांनी केज येथील फुले नगर भागात सापळा लावला आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश घुगे याला राजुबाई कृष्णा थोरात यांच्या घरातून ताब्यात घेतले.

आरोपी तृतीयपंथीया सोबत वास्तव्य : केज पोलिसांनी जालना जिल्ह्यातील मौजपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा येथील खंडणी व अपहरण या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आकाश घुगे हा केज येथे आस्था एकनाथ मोहिते या तृतीय पंथीया सोबत राजुबाई थोरात यांच्या खोली मध्ये राहात होते .

ताब्यात घेतलेला आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील :- केज पोलिसांनी खंडणी प्रकरणी ताब्यात घेतलेल आरोपी .आकाश अशोक घुगे अहील्यानगर जिल्ह्यातील मुकींदपूर ता. नेवासा येथील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिली.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!