आपला बीड जिल्हाआपले केजक्रीडा

ज्या मातीमध्ये जन्म झाला त्या मातीचे देने लागते ते दिलेच पाहिजे ; मी केज शहराच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध – बजरंग सोनवणे

विजय स्पोर्ट्स अकॅडमी आयोजीत जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन संपन्न...

वादळवार्ता – केज

विजय स्पोर्ट्स अकॅडमी केजच्या वतीने जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटनाचा कार्यक्रम केज येथे दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सपन्न झाला.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि विजय स्पोर्ट्स अकॅडमी केजच्या वतीने जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन केले असता आज रोजी उद्‌घाटनाचा कार्यक्रम सपन्न झाला.

सदरील कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन सुरेश तात्या पाटील व उद्‌घाटक म्हणून येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे जेष्ट नेते बजरंग सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणुन केज विधानसभेचे आमदार पृथ्वीराज साठे हे होते. तसेच पी.एस.आय फारोकी कादरी, सामाजीक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर, सर्वज्ञ अकॅडमीचे बांगर सर , ताबेश्वर गुरुकूलचे नेहरकर सर , कडेकर सर , डिजिटल मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष रामदास तपसे , पत्रकार सुहास छिद्रवार , पत्रकार अजय भांगे , नगरसेवक भाऊसाहेब गुंड अशोक गायकवाड , मगर सर , जिशान सर , अंबादास काळे सर आदिंच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मान्यवरांचा स्वागताला कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मनोगतामध्ये हनुमंत भोसले यांनी बोलताना ” केज क्रिडा क्षेत्रात जिवंतपणा आणण्याचे काम विनोद गुंड यांनी केले आहे ” त्याना साथ देणे गरजेचे आहे तर माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आम्ही आपल्या माध्यमातुन विद्यार्थ्यांचा सर्वगुण संपन्न विकास घडविण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करू तसेच बजरंग बप्पा सोनवणे यांनी ज्या मातीत जन्म झाला , त्या मातीचे देणे लागते व ते दिलेच पाहिजे त्यासाठी केज तालुक्यातील ,शहरातील प्रत्येक समस्या सोडवण्यास कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले.

यानंतर सर्वज्ञ अकॅडमीचे पोलिस भरती झालेल्या उमेदवारांचा तसेच नेमबाजीत राज्यस्तरावर निवड झालेल्या समृद्धी काळे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. शेवटी अध्यक्षीय समारोप सुरेश तात्या पाटील यांनी केला. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महादेव गिरी सर यांनी केले तर आभार विनोद गुंड सर यांनी मानले.

सदरील कार्यक्रमास जिल्हयातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तथा पालक उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!