वादळवार्ता – बीड
हल्ली समाजामध्ये वावरताना प्रमाणीक माणसं फार तुरळक दिसतात वा भेटतात. रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी कोणती वस्तु हरवली किंवा न कळत गडबडीत रहिली तर मिळणे अशक्यच समजा, हं जर प्रमाणीक, इनामदार व्यक्तीच्या हाताला लागली तर मग नशीबच.
याबाबत माहिती अशी कि जि.प. शाळेचे शिक्षक तथा जिल्हा समीतीचे राहुल उंडाळे हे आपल्या औरंगाबाद येथील रुग्णालयात ॲडमिट पाहुण्यानां भेटुन बीड बसस्टॅन्डवर आले. तेथुन रिक्षामध्ये बसुन त्यांना त्यांच्या बीड येथील निवास्थांनी जायचे होते. परंतु रिक्षा मध्ये पॅसेजंर येत नसल्याकारणाने त्यांनी तो रिक्षा सोडुन दुसरा रिक्षाचालक कृष्णा खटाणे रा.कर्झणी यांच्या रिक्षामध्ये बसले असता आपल्या निवासस्थानी रिक्षा गेल्यानंतर राहुल उडांळे यांचा मोबाईल रिक्षातच विसरून राहिला विशेष म्हणजे तो मोबाईल डिस्चार्ज झाला होता. त्यानंतर राहुल उडांळे यांनी त्याच्या मोबाईलवर वारंवार फोन केले परंतु मोबाईल बंद आहे आसाच रिप्लाय सतत येत होता. रिक्षाचालक कृष्णा खटाणे यांना मोबाईल रिक्षामध्ये मिळल्यानंतर त्यांनी मोबाईल चार्जींग करून स्वीच ऑन केला. त्यावर लगेच अशोक उडांळेचा फोन आल्यानंतर तुमचा फोन माझ्याकडे आहे सुरक्षित आहे, आणि तुम्हाला मी तो देतो असे सांगितल्या नंतर त्यांनी तो फोन प्रामाणिकपणे परत केला. हा प्रमाणीकपणा पाहुन राहुल उडांळे यांनी प्रमाणीक , इमानदार असणारे कृष्णा खटाणे यांचा योग्य सन्मान केला.
यामुळे रिक्षाचालक कृष्णा खटाणे यांच्या प्रमाणीकपणाची सर्वत्र चर्चा होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!