आपला जिल्हानिवडणुक

राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांची चौथ्यांदा निवड तर उपसभापतीपदी ईंजिनियर अरविंद वाढोणकर

वादळवार्ता – यवतमाळ

राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच झाली होती.त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने चौदा उमेदवार निवडून आणले .अशातच सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया बाकी असतानाच दिनांक 26/5/2023 रोज शुक्रवारला ठीक बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सभापती व उपसभापती पदाची निवडणूक संपन्न झाली . यामध्ये सभापती पदासाठी सहकार क्षेत्राचे सर्वेसर्वा,सहकार महर्षी अडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांचे नाव एकमताने सुचविण्यात आले.आणि या नावाला एकमताने अनुमोदन दिले. एकच उमेदवारी दाखल झाल्यांने काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांना सभापती म्हणून घोषित करण्यात आले. तर उपसभापतीपदी काॅंग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर अरविंद वाढोणकर यांची निवड करण्यात आली.हीनिवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून रणमले साहेब यांनी काम पाहिले .

.यावेळी काॅंग्रेस पक्षाचे नेते तथा माजी शिक्षणमंत्री तथा नुकतेच कर्नाटक निवडणुकीत यशस्वी कामगिरी पार पाडणारे सर्वांचे लाडके आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्राध्यापक वसंतराव पुरके सर उपस्थित होते.उपस्थित जेष्ठ आणि श्रेष्ठ नेते, कार्यकर्त्यांनी नवनियुक्त सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सहकार क्षेत्रातील राळेगाव, बाभूळगाव, कळंब मतदारसंघात यशस्वी पकड मजबूत झाल्यामुळे नेत्यासह कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत असून या दोन्ही नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा देण्यासाठी संचालक दीपक देशमुख, अंकित कटारिया, संजय देशमुख,राजू ठाकरे, गोविंद चहांदकर, गोवर्धन वाघमारे, अंकुश मुनेश्वर,राजू महाजन,आशिष कोल्हे, गजानन पारखी, प्राजक्ता कोकाटे,माया जयपूरकर यांच्या सह काॅंग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे,शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, उपाध्यक्ष मारोतराव पाल, नगराध्यक्ष रविंद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव भाऊ गिरी,वसंत जिनिंगचे अध्यक्ष नंदकुमार गांधी, मनोज मानकर, प्रविण कोकाटे, अरविंद फुटाणे,सिद्धेश मानकर, डॉ.केंढे,श्रावनसिंग वडते,रामूजी भोयर,आशिष पारधी,मंगेश पिंपरे,जितू कहूरके,मनिष बोरा, प्रकाश मेहता, भानुदास राऊत, प्रकाश पोपट,अनिल केवटे, बादशहा काझी,पवन छोरीया, भैय्या बहाळे, विनोद जयपूरकर,मनिष गांधी,राजेश काळे, गजानन पाल,बंडू धूळे,जिवन मेश्राम,कवडू कांबळे, कृष्णराव राहूळकर, मुकुंद मानकर,शामंकान्त येणोरकर,अजाब आत्राम, पंकज गावंडे, केशवराव पडोळे, मयूर जुमळे, उत्तम भोरे, सुभाष भोयर,पुनेश्वर ऊईके, प्रफुल्ल तायवाडे, जनार्दन कडू, गणेश बुरले, रामधन राठोड,सागर इंगोले,कमलेश गयलोत, कुंदन कांबळे, प्रफुल्ल वटाणे, गजानन पुरोहित, रविंद्र निवल,सनी छोरीया, विनायक बरडे, गणेश नेहारे,अनिल देशमुख, मधूकर राजूरकर,राजू दुधपोहळे,ईब्बू सेठ, विठ्ठल चहांदकर,अनिल दाणे,अफसर अली, सुरेश पेंद्राम, धनंजय दांडेकर, पुरूषोत्तम चिडे, बाळासाहेब दरणे,निश्चल बोभाटे, अभिजित मानकर महादेव देठे, प्रदीप डाखोरे , विनायक काकडे, ज्ञानेश्वर घोटेकार यांच्या सह अनेक जेष्ठ आणि श्रेष्ठ,नवयुवकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या असून कर्नाटक पासून सुरू झालेला विजय हा आता राळेगाव विधानसभा क्षेत्रात पोहचला असून कर्नाटकात प्रचारासाठी गेलेले वसंतराव पुरके यांच्या निमित्ताने महाराष्ट्रात,देशात सुद्धा विजयाचे वारे वाहण्याची शक्यता दिसून येत आहे ‌

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!