आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

आरणगाव येथे घरफोडी : ५० हजाराचा ऐवज चोरी

वादळवार्तागौतम बचुटे

केज तालुक्यातील आरणगाव येथे घरफोडी झाली असून नगदी रोख रकमेसह पन्नास हजार रु. चा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

आरणगाव ता. केज येथे दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री ते १६ फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान अवधूत महादेव सिरसाट यांचे अज्ञात चोरट्यानी घरफोडून घरातील सुटकेस व पेटी पळवून नेली. त्यातील नगदी सहा हजार रु. व सोन्याचे गंठण आणि सोन्याचे मनी असा एकूण ५० हजार रु. चा ऐवज काढून घेऊन रिकामी सुटकेस व पेटीतील कपडे हे गावा शेजारी रघुनाथ इतापे यांच्या शेतात फेकून दिले. तसेच आरणगाव येथे चोरट्यानी शांतीनाथ भांगे आणि लक्ष्मण भांगे यांचेही घर उघडून चोरीचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशा वरून पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि बिट जमादार राजू गुंजाळ यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!