वादळवार्ता – केज
केज शहरातुन जाणारा उमरी रस्ता , रस्त्याच्या आजुबाजूला शाळा , ट्युशन क्लासेस , शुक्रवारचा बाजाराची गर्दी, शालेय विद्यार्थ्याचा ये – जा करण्याचा प्रमुख रस्ता , क्रिकेट च्या विविध स्पर्धा तथा सकाळी – संध्याकाळी वयोवृद्ध व्यक्तीचें शत – पाउली, व्यायामाचे रहदारी युक्त स्थान परंतु उमरी रस्ता उखडुन गेलाय त्याला मोठं मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून जाताना प्रत्येकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
पाठीमागे जवळपास १० ते १५ वर्षापासुन या रस्त्यासाठी हनुमंत भोसले तथा रस्त्याशी निगडीत असणारे सर्व नागरीकांच्या वतीने वेळोवेळी अंदोलन उभे केली आहेत तथा पाठपुरावा करत आहेत.
नगरपंचायतीच्या प्रशासनाच्या काळात केजचे भूमीपुत्र मुख्याधिकारी देशपांडे यांच्या काळात या रस्त्या संबधी योग्य तो पाठपुरावा करुण ” रस्त्याची आवश्यकता ” शासन दरबारी मांडली आणी शासनाने सदरील रस्त्याकरीता ९८ लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला तसे पत्र देखील आले मात्र त्यावर कित्येक महिने लोटुनही कार्यालयीन प्रक्रिया झाली नाही. वादळ वार्ता च्या माध्यमातून ९८ लक्ष रुपयांच्या निधी मंजुरीचे पत्र , बातमी प्रथम प्रकाशीत करण्यात आली . त्याचा आधार घेऊन परत नगरपंचायतीच्या विरोधात हनुमंत भोसले यांनी परत अंदोलनाचे शस्त्र उगारत ई- निविदा तात्काळ करा अन्यथा अमरण उपोषण करण्याचा यल्गार पुकारल्यानंतर केज नगरपंचायतीने कार्यलयीन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे.
मात्र केजच्या विकासाच्या संदर्भात सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजीचा सुर दिसुन येत आहे. त्यात उमरी रस्त्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न ! कांही दिवसांनी उमरी रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल , परंतु उमरी रस्त्यावरचे असणारे अतिक्रमण हि एक चिंतेची बाब निर्माण होणार आहे . त्या बरोबरच रस्त्याचे काम ज्या संस्थेच्या माध्यमातुन गुत्तेदार करणार आहे. त्या रस्त्याचे इंस्टमेन्ट सर्वसामान्य नागरीकांना पाहण्यासाठी दर्शनिय भागामध्ये लावतील का ? रस्त्याचे काम भ्रष्टाचार विरहित , टक्केवारी विरहीत होईल का ? का पडतील भ्रष्टाचाराच्या, टक्केवारीचे खड्डे ? १५ वर्ष रस्त्याकरीता संघर्ष करणारे रस्त्याच्या बारीक – सारीक गोष्टीकडे लक्ष देतील का ? आदि प्रश्न सर्वसान्य नागरीकांना पडले आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!