वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात पिसेगाव येथे साजरी करण्यात आली…
सदरील माहिती अशी की, संपुर्ण देशांमध्ये अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.त्याच प्रमाणे केज तालुक्यातील मौजे पिसेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सर्व प्रथम मा.आ. प्रथ्वीराज साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.व नंतर अण्णाभाऊ साठे, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आलेले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून कु. श्रुती जाधव यांनी आपले मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आजच्या नव तरूण पिढीने अण्णाभाऊ साठे यांचे. विचार आत्मसात केले पाहिजे.आण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबरी, लोकगीते, वाचली पाहिजेत,व त्या मार्गांने आपण कार्य केले पाहिजे. तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रंजीत घाडगे यांनी आपल्या मनोगतामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर बोलताना सांगितले की, शिक्षण शिकत असताने व्यक्तीने परस्थिती चे कारण न सांगता शिकले पाहिजे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन अण्णाभाऊ साठे यांनी कार्य केले. “जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भिमराव” या उक्तीप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना गुरू मानुन अण्णाभाऊ यांनी कार्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा आ पृथ्वीराज साठे यांनी बोलताना सांगितले की, दलीत, मातंग, समाजासाठी शासनाने वेगवेगळे महामंडळ स्थापन केले आहेत, जसे की, अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, या महामंडळाचा समाजातील प्रत्येक व्यक्तीने लाभ घेतला पाहिजे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे व समाजाने प्रगतिच्या दिशेने गेले पाहिजे, असे आपल्या मनोगतात बोलतांने सांगितले तसेच त्यांनी जयंती निमित्त भाषण स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या त्यातील विद्यार्थ्यांना एक हजार रुपये मा आ पृथ्वीराज साठे यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा आ पृथ्वीराज साठे, शिव व्याख्याती कु. श्रुती जाधव, पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रंजीत घाडगे, सरपंच महादेव सुर्यवंशी, विठ्ठल वैरागे, रमेश पाटुळे, जयंती समितीचे अध्यक्ष सोपान लांडगे, उपाध्यक्ष रितेश लांडगे, नियोजन गणेश जाधव,दिपक लांडगे, महेश लांडगे,सुरज लांडगे,माजी सरपंच बप्पा लांडगे, गावातील सर्व नागरिक व शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश लांडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन लांडगे यांनी मांडले
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!