आपला जिल्हा

वडकी पोलीसांची सोशल मीडीयावर जनजागृती 

वादळवार्ता – यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी येथे दि नांक 26/05/2023 रोजी पोलीस स्टेशन वडकी हद्दीतील ग्राम वडकी, वाढोना बाजार, खैरी गावातील लोकांमध्ये सोशल मीडिया बाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सोशल मीडिया जसे व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर याद्वारे धार्मिक भावना भडकविणारे किंवा समाजात तेढ निर्माण होईल अशाप्रकारची आक्षेपार्य माहिती जसे फोटो, व्हिडीओ, मेसेज शेअर करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. अशी माहिती फॉरवर्ड केल्यास गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे ज्या मध्ये जामीन मिळणार नाही असे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही माहिती शेयर करतांना काळजी घ्यावी. याबाबत पोलीस स्टेशन हद्दीत लोकांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आक्षेपार्ह माहिती प्रसारित न करण्याबाबत जनतेचा वावर असलेल्या दर्शनीय भागात बॅनर व वाहनावर पाॅम्प्लेट लावले व नागरिकांना पॉम्प्लेट देऊन जनजागृती करण्यात आली. सदरची जनजागृती मा श्री पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, प्रदीप पाटील, उपविभागीय पोलीस पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात ठाणेदार विजय महाले व अंमलदार यांनी केली यावेळी अनेक गावांतील नागरीक उपस्थित होते

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!