आपला जिल्हाआपले केज

हळदीकुंकू समारंभात श्री क्षेत्र मार्तंड जेजुरी देवस्थानचा जिवंत देखावा; देखाव्याचे सर्वत्र कौतुक

केज/प्रतिनिधी

महिलांचा विशेष सण म्हणून संक्रांतीच्या सनाला विशेष महत्त्व आहे. त्यानंतर जे हळदीकुंकू महीला घरोघरी जाऊन साजरी करतात ते पारंपरिक पद्धतीने सुरू आहेच पण अलिकडच्या काळात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येत आहे. असेच हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केज येथे कानडी रोड येथे दि. १६ रोजी आयोजित करण्यात आले होते. ते सर्व शहरात कौतुकास्पद ठरले असल्याचे बोलले जात आहे.

या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन सौ. पार्वती गाढवे, सौ. रेखा तेलंग, सौ. सुनिता सोनवणे, सौ. मनिषा सव्वासे,सौ. रामकवर तोंडे या महीलांनी केले होते. या हळदीकुंकू कार्यक्रमात श्री क्षेत्र मार्तंड जेजुरी देवस्थान दाखवून आयोजक महीलांनी खंडोबा, माळसा, बानू, लक्ष्मी असे वेशभूषा परिधान करून येणाऱ्या महीलांना हळदीकुंकू समारंभात औक्षण करून विविध भेट वस्तू देण्यात आल्या आहेत. तसेच येणाऱ्या महीलामंडळिनां अल्पोउपअहाराची ही व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी शहरातील बहुसंख्य महीलांची उपस्थिती होत्या. या आगळ्यावेगळ्या हळदीकुंकू समारंभाचे शहरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!