वादळवार्ता – केज
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा , शहर शाखा केज कार्यकारणी निवडीच्या संदर्भांने महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी कि भारतीय बौद्ध महासभा बीड (पूर्व) चे जिल्हाध्यक्ष बी.बी. धन्वे यांच्या पत्रान्वये भारतीय बौद्ध महासभा केज तालुका ,शहर शाखेचे पुनर्गठन करण्यासाठी तसेच कार्य अहवाल जमा-खर्च याची तपासणी करण्यासाठी केज तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे यांना कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने दि.०४ जुन २०२३ वार .रविवार रोजी रमाई बुद्ध विहार फुले नगर केज येथे सकाळी ११ वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीस भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी भारतीय बौध्द महासभा केज तालुका शाखा, शहर शाखेमध्ये काम करू इच्छिणार्यांनी तथा भारतीय बौद्ध महासभा आजी – माजी पदाधिकारी ,बौध्दाचार्य यांनी सदरील बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा केज तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!