दिग्गजांना दिला गावकऱ्यांनी दे धक्का….
२३ पैकी ११ ग्रामपंचायतवर बजरंग सोनवणेचे वर्चस्व
अद्भूत ” नोटा व सदस्य पदाच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत
वादळवार्ता/केज
डोणगाव प्रभाग कं ३ नोटा व सदस्य पदाच्या उमेदवार मध्ये चुरशीची लढतीत सदस्य उमेदवार १४ मतांनी विजयी
नांदुरघाट ग्रामपंचायतीत भाजपाचे संतोष हंगे यांच्या हातून सत्ता निसटली
होळ मध्ये मुंदाडा गटाचा दारुण पराभव
आडस मध्ये आडसकरांनी राखला गड
बनसारोळा ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे , रमेश आडसकर , बजरंग सोनवणे यांच्या आघाडीला स्थानीक गावकऱ्यांनी दिला धक्का
केज तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील एकुण २४ ग्रामपंचायती पौकी २३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान दि.५ रोजी झाले होते कारण तालुक्यातील भालगाव ग्रामपंचायतीने मराठा आरक्षणासाठी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता त्यामुळे तेथील मतदान होऊ शकले नाही तर उर्वरित ग्रामपंचतीचे दि.६ रोजी केज तहसील कार्यालयात मत मोजणी होऊन निकाल घोषीत करण्यात आले केज तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत गट तट पक्ष असले तरी ग्रामस्थांनी निवडून दिलेले सरपंच व पुढील प्रमाणे
१) नांदुरघाट सौ सुनिता युवराज जाधव ( स्थानीक आघाडी)
२) काळेगाव घाट अविनाश रामचंद्र गाताडे( बजरंग सोनवणे गट )
३) शिरपुरा रविंद्र आत्माराम लांडगे( बजरंग सोनवणे गट )
४) माळेगाव सौ रोहीणी कैलास गव्हाणे ( स्थानीक आघाडी)
५) नायगाव सौ अश्विनी विवेक खोडसे (बजरंग सोनवणे गट )
६) युसुफवडगाव सौ सुलक्षणा महेश गायके ( बजरंग सोनवणे गट )
७) होळ सौ अश्विनी सुरेश शिदें( भाजप आडसकर गट )
८) आडस सौ योगेश्वरी व्यंकटेश देशमुख( आडसकर गट भाजप)
९) मुलेगाव गोरख धनराज लाड ( बजरंग सोनवणे गट )
१०) कोल्हेवाडी सौ प्रेमला नंदुलाल मिसाळ ( भाजप)
११) लिंबाचीवाडी नामदेव कांबळे( बजरंग सोनवणे गट )
१२) सासुरा गोविंद पाळवदे (भाजप )
१३) पिटटीघाट सौ चंद्रकला प्रकाश मस्के( बजरंग सोनवणे गट )
१४) आरणगाव सौ आशाबाई मारुती सिरसट( स्थानीक आघाडी)
१५) डोणगाव भगत बळीराम हारीभाऊ( स्थानीक आघाडी)
१६) सुर्डी सौ महानंदा विश्वजीत राऊत( स्थानीक आघाडी)
१७) बनसारोळा अजित हनुमंत गोरे( स्थानीक आघाडी)
१८) बोरीसावरगाव वौजनाथ रामराव देशमुख( स्थानीक आघाडी)
१९) केकाणवाडी सौ रुपाली संतोष केकान( आडसकर गट)
२०) उंदरी सौ अश्विनी धनसंपत ठोंबरे( मुंदडा गट)
२१) तरनळी खेडकर महादेव प्रताप
२२) पिराचीवाडी सौ जिजाबाई हारीभाऊ यादव ( स्थानीक आघाडी)
२३) बनकरंजा सौ रोहीणी कृष्णा थोरात (बजरंग सोनवणे गट)
२४) भालगाव बहिष्कार
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!