आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक

सोशल मिडियाचा वापर करणाऱ्या करिता सहाय्यक पोलिस निरक्षक शंकर वाघमोडे यांचे महत्वपूर्ण आवाहन…

वादळवार्ता वार्तांकन – केज

केज पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.

आज सगळ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, सगळे सोशल मीडियाचा (व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इ.) चा वापर करतात.

समाजात वावरताना आपण सर्व जाती-धर्म विसरून एकमेकांसोबत भाईचारा ठेवून वावरतोत, तरीपण काही विकृत बुद्धीचे समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे स्टेटस, व्हिडीओ, फोटो अपलोड करून द्वेष भावना निर्माण करू शकतात त्यात शिकणारे विद्यार्थी यांचाच बळी जाण्याची शकतात 99% आहे..त्यामुळे पालकांनी आशा लोकांपासून मुलांना दूर ठेवावे .

ज्या मुलांना परिणामाची जाणीव नाही आशेच मुल निवडतात आणि त्यांची मदत घेऊन कृती करतात…मला येते फक्त 16 महिने झाले आपण येथे वर्षानुवर्ष पासून राहतात मला वाटतं आपल्याला पण माहीत असेल ते कोण आहे.,.मुलांचे नुकसान होऊ नये हीच प्रामाणिक इच्छा आहे ..

अशा कृतीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.

        अशी कृत्ये केल्यामुळे दोन समाजात भांडण-तंटे होऊन जातीय तेढ निर्माण होऊन गुन्हे दाखल होऊ शकतात आणि तुमच्या मुलाचे भविष्य खराब होऊ शकते त्या मुळे काळजी घ्यावी..

काही सुजाण नागरिक व तरुण युवक वर्गाचे सतर्कतेमुळे भरपूर प्रकरण

हे वेळीच सावध राहून आम्ही प्रतिबंध केलेली आहे..पण या पुढे नाही…जे चुकी करणार त्यांना भोगावे लागणार..

आज पर्यंत केज तालुक्यात व केज शहरात अशा कृतीमुळे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही.

तरी केज पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येते की, केज पोलीस स्टेशन व सायबर क्राईम या गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेऊन आहे, आम्ही (व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर) दररोज चेक करत आहोत. केज तालुक्यात व केज शहरात शांततामय वातावरण आहे, कोणी समाजकंटक (कोणत्याही समाजाचा अथवा कोणीही असो) त्याने शांततामय वातावरण खराब करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे आमचे निदर्शनास आल्यास त्यांचे विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

तरी सोशल मिडियाचा वापर करताना सावधानता बाळगावी असे आवाहन केज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!