वादळवार्ता वार्तांकन – मुबाशेरोद्दीन खतीब
केज तालुक्यातील बरडफाटा ते वडमाऊली जाणाऱ्या रोडच्या कडेला देवगाव चौकात बेकायदेशिररित्या विनापरवाना देशी दारु बॉबी संत्रा कंपनीच्या काचेच्या बाटल्या चोरून विकताना हनुमंत महादेव ठोंबरे रा.दहिफळ वडमाऊली याला रंगेहाथ पकडले असता त्याच्याकडुन देशी दारू बॉबी संत्रा कंपनीच्या १८० मी.च्या काचेच्या १२ बाटल्या प्रत्येकी ७० रुपये प्रामाणे ८४० रुपयांचा बाटल्या सापडल्या असता त्या जप्त करुन केज पोलीस ठाण्यात फिर्यादी पो.ह.अभिमान भालेराव यांच्या फिर्यादी वरून गुरन.५७२/२२ प्रमाणे कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असुन या घटनेचा पुढील तपास अशोक मेसे करत आहेत.