आपला बीड जिल्हाक्राईम

दवाखान्यात उपचारास जात असताना डोनगाव फाट्यावर पिकपची धडक – गुन्हा दाखल

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

दवाखान्यात उपचारास जात असताना डोनगाव फाट्यावर पिकपची धडक केज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल

सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यतील सारुळ येथील रहिवाशी दशरथ हरिभाऊ ढाकणे हे आपला भाऊ जालींदर ढाकणे यांना मोटारसाकल क्र.MH44R9124 वरून केजकडे दवाखान्यात घेऊन निघाले असता डोनगाव फाट्यावर केज कडुन बीड कडे जाणारे पिकअप क्र.MH24A5670 च्या चालकाने हायगई व निष्काळजीपणे गाडी चालवत भरघाव वेगाने मोटार सायकलला समोरून जोराची धडक दिली असता जालिंदर ढाकणे यांना गंभीर जखमी केले म्हणुन दशरथ हरिभाऊ ढाकणे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाणे येथे गुरनं. 458 / 2022 प्रमाणे कलम 279 , 337,338 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे .

पुढील तपास सपोनि. शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोना. गिरी हे करत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!