आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक

जिवाची पर्वा न करता शेतकरीराजा राष्ट्रीय महामार्गावर बसुन विकतोय भाजी ; केज नगरपंचायत फक्त कर वसुल करण्यात मग्न ; शेतकऱ्यांची नाही काळजी

बाजारात वर्षानुवर्ष शेतकऱ्यांची अवहेलना

नगराध्यक्षाचे तथा नगर पंचायतच्या सताधार्यांचे सपशेल दुर्लक्ष

कोट्यावधींचा निधी मात्र केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे आठवडी बाजारात हाल 

वादळवार्ता – केज

बळीराजा साऱ्या जगाचा पोशिंदा’ ऊन- वारा पाउसामध्ये राबराब राबुन रक्ताचं पाणी करुण पिक घ्यायच , त्याला जोपासायचं अनं गाठायचा शहराचा बाजार , शहराच्या बाजारात जागा मिळेल तिथे दिवसभर बसायचे आणी आपल्या कुटुंबासाठी अर्थाजन करायचे मग त्या ठिकाणी त्याची सोय होईल कि गैरसोय , पाणी मिळेल की नाही , सावली असेल का ऊन , माल विकेल कि नाही आदि प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतात नि सुरु होतो त्याचा संघर्ष.

या बाबत सविस्तर वृत्त असे की केज शहरामध्ये दोन मोठी आठवडी बाजार भरतात एक मंगळवारी तर दुसरा शुक्रवारी,शहरातील तथा तालुक्यातील सर्वसामान्या पासुन ते श्रीमंतापर्यंत या बाजारास विविध वस्तु तथा भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात . मात्र या बाजारात भाजीपाला विकणाऱ्या शेतकर्‍याची फार गैरसोय होत असताना पाहावयास मिळंत आहे. ना बसायला जागा ना पिण्यासाठी पाणी अहो सौचालय तर दुरच तरी देखील शेतकरी हालअपेष्टा सहन करून संघर्ष करतोय प्रत्येक बाजारात.

वरतुन केज नगरपंचायतचे प्रशासन वा सत्ताधारी कोणतीही सुविधा देता सक्तीने कर वसुल करतात जमेल तसे पैसे मिळवतात कोणाला देतात पावती तर कोणाला नाही. एक बाजार भरतो मंगळवार पेठच्या रस्त्यावर तर दुसरा पंचायत समितीच्या मैदानात जागा नगरपंचायतची नसताना मात्र कर नगरपंचायतच्या खात्यात वा गुत्तेदाराच्या खिशात जातो .

आज तर चक्क मंगळवार पेठच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शेतकरी , बाजारात बसण्याकरीता जागा नसल्यामुळे समोरच असणा-या अंबाजोगाई – बीड राष्ट्रीय महामार्गावर फार जवळुन ,जिवाची पर्वा न करता भाजी – पाला विकण्यासाठी बसले होते. हे दृश्य फारच जीवाला हुरहुर लाऊन गेले.या दृश्याकडे ना आमदारांचे लक्ष गेले ना केज नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांचे.

राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण वा मजबुतीकरण झाल्यापासुन रहदारीचे प्रमाण केज शहरात मोठ्या प्रमाणात वाढले आहे . आशातच शेतकरी रस्त्याच्या जवळ बसल्यामुळे भविष्यात मोठा अपघात झाला तर ? नगराध्यक्षा वा नगरपंचायचे प्रशासन वा सत्ताधारी याची जिम्मेदारी घेतील का ? केज तालुक्यातील आठवडी बाजारात येणाऱ्या शेतकर्‍याला सुःख सुविधा मिळतील का ? आदि प्रश्न केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तथा सर्वसामान्य नागरीकांच्या चर्चेमधुन समोर येत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!