अडीच ते सव्वा दोन महिन्या पूर्वी अमावस्याच्या रात्री तालुक्यातील केज-बीड रोडवर असलेल्या रेणुका कला केंद्रात काम करीत असलेल्या नर्तिकेच्या खून प्रकरणातील सहा आरोपी पैकी कला केंद्राचा मालक व मुख्य आरोपी सोबत असलेला आणि महिला व बाल कल्याण समितीच्या शाळेत शिक्षक असलेल्या एकाला केजच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. त्या दोघांना ३० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मयत – शितल कांबळे
या बाबतची माहिती अशी की, अडीच ते सव्वा दोन महिन्या पूर्वी अमावस्याच्या रात्री (१८ जून २०२३) केज तालुक्यातील केज-बीड रोडवरील सारूळ पाटी जवळच्या रेणुका कला केंद्रात नाचकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या शितल कांबळे हिचा बरड फाट्यावर राजयोग लॉजवर घेऊन जाऊन गजानन उर्फ गज्जू कराळे याने तीक्ष्ण धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार करून नाक तोंड दाबून खून केला होता. खून केल्या नंतर गजानन उर्फ गज्जू हा पळून गेला होता. मात्र त्या नंतर उद्धव घुगे याच्यासह कला केंद्राचा मालक रामनाथ ढाकणे, वसुदेव सारूक, लॉजचा मॅनेजर राठोड, कला केंद्रातील शमीम भाबी यांनी मयत शितलच्या नातेवाईकांना धमकी देऊन हे प्रकरण पोलिसांना कळू न देता मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.
या खून प्रकरणी अडीच महिन्या नंतर मयत शितल कांबळेच्या आईने सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची भेट घेऊन सर्व हकीकत त्यांना कानावर घातली. पंकज कुमावत यांनी त्यांना विश्वास दिला आणि दि. २४ ऑगस्ट रोजी गजानन उर्फ गज्जू कराळे त्याचा मित्र उद्धव घुगे याच्यासह कला केंद्राचा मालक रामनाथ ढाकणे, वसुदेव सारूक, लॉजचा मॅनेजर राठोड, कला कला केंद्रातील शमीम भाबी या सहा जणांच्या विरुद्ध खून करून पुरावा नष्ट करणे या आरोपाखाली केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपासाची सूत्रे हलविली. कला केंद्राचा मालक याला कला केंद्रातून ताब्यात घेतले तर या खून प्रकरणाशी संबंधीत आणि परभणी येथील महिला व बालहक्क समितीच्या कार्यालयात शिक्षक म्हणून सेवा करीत असलेला उद्धव घुगे याला पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि त्यांच्या पथकातील दिलीप गित्ते, शमीम पाशा, अनिल मंदे, रुक्मिणी पाचपिंडे यांनी त्यास ताब्यात घेतले.
दरम्यान या दोन्ही आरोपींना केज येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश कुणाल जाधव यांनी त्यांना दि. ३० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस इतर आरोपींच्या मागावर आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!