वादळ वार्ता प्रतिनिधी – महादेव काळे
केज तालुक्यातील-सोनीजवळा दि.११/०७/२२ उमाप कुटूंबाबावर संसार उद्ध्वस्त करणारी ठरली.शेतात मजुरीवर गेले असताना गावात घराला अचानक आग लागली आणि सर्व घर खाली कोसळलं. मजुरी करणाऱ्या या परिवाराचा संसाराचा गाडा रस्त्यावर आला.
उमाप कुटुंब शेती आणि रोज मजुरी यावरच त्यांचा संसाराचा गाडा सुरू आहे. पण या लागलेल्या अगेने घरातले सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. मुकादमांकडून आणलेली तीस हजार रुपये उचल सुद्धा कपाटामध्ये ठेवली असता यात जळून खाक झालेली आहे.
घराला लागलेली ते आग व ते परिस्थिती पाहून उमाप कुटुंबातील माय माऊली या आश्चर्य रडकुंडीला आले आहेत. अस्ताव्यस्त पडलेला पत्र्याचा ढिग, आगीमुळे सर्वत्र पसरलेला काजळीचा थर,पाणावलेले डोळे, खिन्न झालेले चेहरे, तीन तासांच्या प्रयत्नांनंतर घरास लागलेली आग मात्र मिठवण्यात आली.
मात्र संसार उध्वस्त झाल्याने त्या आगीचे चटके उमाप कुटुंबांना बसत होते. माणुसकीचा आधार फाउंडेशनची टीम मदत देण्यासाठी दि.१३/०७/२२सायंकाळी ०८.०० वाजता.केज येथून सोनीजवळा या गावाला रवाना झाली.
जाताना या टीमने एकच विचार केला होता की,माणुसकीचा आधार फाउंडेशन मार्फत होईल ते मदत योग्य व्यक्तीपर्यंत जायला हवी. सोनीजवळा या गावी जातात,माणुसकीचा आधार फाउंडेशन या टीमने घटनाठिकाणी पोहोचल्यानंतर सर्व परिस्थिती पाहून स्तब्ध झाले होते व उमाप कुटुंबाचा संसार आगीत राख होऊन उध्वस्त झाला होता. माणुसकीचा आधार फाउंडेशन च्या वतीने उमाप कुटुंबांना फुलं न फुलाची पाकळी म्हणून संसार उपयोगी साहित्य व किराणा साहित्य देऊन एक छोटासा मदतीचा हात पुढे केला आहे.
माणुसकीचा आधार फाउंडेशन टीमचे विकास गवळी सर,डॉ.निखिल भालेराव,डॉ.विवेकांनद डोईफोडे,अजित धपाटे,प्रताप वैरागे,अमर धपाटे,महावीर पटेकर,कृष्णा सूर्यवंशी,परमेश्वर बोबडे,राहुल पटेकर,निलेश तोडकर, या सर्वांनी चांगल्या प्रकारे मदत कार्य पार पाडले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!