आपला बीड जिल्हा

तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावेत्तर स्पर्धा गटसाधन केंद्र येथे संपन्न

विज्ञान युक्तीवादास तालुक्यातील विद्यार्थ्याचा सहभाग !

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

गट साधन केंद्र केजच्या वतीने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा गटशिक्षण अधिकारी केंद्रे एस.एस. यांच्या मार्गदर्शखाली संपन्न झाला .

सविस्तर वृत्त असे कि केज येथील गटसाधन केंद्र येथे विविध शैक्षणिक स्पर्धेचे आयोजन शिक्षण अधिकारी केंद्रे एस. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतात . त्यापैकी आज दि १० सप्टेंबर रोजी केज येथील गटसाधन केंद्रामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आयोजीत करण्यात आला होता.

सदरील विज्ञान मेळाव्यास ” शाश्वत विकासाठी मुलभुत विज्ञान आव्हाने आणि शक्यता ” या विषयावर युक्तीवाद करण्याकरीता पवनराजे इंग्लिश स्कुल केजची विद्यार्थानी विदिशा राहुल गायकवाड, जि.प.मा.शा मस्साजोगची विद्यार्थीनी गायकवाड पुजा विजय, शाम विद्यालय दहिफळ ची विद्यार्थ्यानी हाराळे समृद्धी सुभाष, रामरा पाटील विद्यालयाचा विद्यार्थी साळवे सौरभ जगन्नाथ, युसूफवडगाव हायस्कुलचा विद्यार्थ्यी थळकरी शिवशंकर रामेश्वर, जिवन शिक्षण केजची विद्यार्थ्यीनी शेख जिकरा खयुम, सरस्वती कन्या प्र.केजची विद्यार्थ्यांनी साखरे समृद्धी दिलीप, धनश्वरी मा.वि. धनेगावचा विद्यार्थी शिंदे अशोक संजय, हनुमान वि .विडा विद्यार्थीनी पवार अनुष्का सुरेश, जि.प.उ.प्रा.शा. उमरीची विद्यार्थीनी मुळे आरती बाळासाहेब, नुरजहॉ उर्दु हाय.केजची विद्यार्थिनी इनामदार जर्रान जिउद्दीन,विश्वनाथ कराड केजची विद्यार्थ्यांनी घुले स्वाती तुकाराम आणी साने गुरुजी विद्यालयाची विद्यार्थीनी चौरे वैष्णवी भीमराव इत्यादिनी विषयानुरूप विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गटशिक्षण अधिकारी केंद्रे एस.एस. यांनी स्पर्धेकांना सुचना तथा विज्ञानवादी दृष्टीकोण ठेवुन विद्यार्थ्यांनी आभ्यास व कार्य करावे असे मार्गदर्शन केले. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणुन तरकसे सर , देशपांडे सर , अजगुंडे सर , माने डि.एम. तज्ञ व्यक्तिनी मार्गदर्शन केले. स्पर्धा संपल्यानंतर लगेचच परिक्षकांनी विजेत्यांची नावे जाहीर केली .

त्याप्रमाणे प्रथम चौरे वैष्णवी भिमराव , व्दितीय पवार अणुष्का सुरेश तर तृतीय विदीशा राहुल गायकवाड यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या . प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या .

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेंदपाठक सर यांनी केले तर आभार अजगुंडे सर यांनी मानले . सदरील स्पर्धेकरीता गटसाधन केंद्र येथील गटसाधन विशेष व्यक्ती तथा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!