आपला बीड जिल्हा

” बिल्कीस बानोच्या हत्यारांना शिक्षा द्या “

बिल्कीस बानो प्रकरणी केजमध्ये संविधान बचाओ संघर्ष समितीचा प्रचंड मोर्चा

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

बिल्किस बानो प्रकरणातील सामूहिक बलात्कार आणि सामूहिक हत्याकांडातील दोषींची माफी रद्द करून त्यांना शिक्षा देण्याच्या मागणीसाठी केज येथे मुस्लिम महिलांनी संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने केज शहरातून तहसील कार्यालयावर प्रचंड भव्य मोर्चा काढला.

गुरुवार १५ सप्टेंबर रोजी केज येथे संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने केज शहरातून मुस्लिम महिलांच्या गुजरात मधील बानो यांच्यावर अत्याचार करून त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या ११ जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा फाशीची कठोर शिक्षा द्यावी. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या लोकां विरुद्ध कडक कारवाई करावी. त्यासाठी कठोर कायदा लागू करावा. भारतातील अल्पसंख्यांक समुदायावर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध कडक कायदा करावा. या मागण्यासाठी केजमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने अभूतपूर्व असा भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा हजरत ख्वाजा मजहबोद्दीन बाबाच्या दर्गा पासून मोर्चाला सुरुवात झाली. त्या नंतर पुढे आंबेडकर चौक मंगळवार पेठ बस स्टॅन्ड शिवाजी चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मुस्लिम भगिनींनी हातात काळे झेंडे आणि तिरंगा झेंडे घेऊन अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत मोर्चा काढला. मोर्चात शालेय मुली आणि मोर्चेकरी महिलांच्या कडेवर लहान मुले देखील होते. या मोर्चात केजच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड देखील सहभागी झाल्या होत्या. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकताच यावेळी मुलींनी बिल्कीस बानो प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शासन देण्याची मागणी केली. मोर्चेकऱ्यांच्या वतीने मोर्चातील मुली आणि नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांच्या वतीने दिलेले मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांनी स्वीकारले.

________________________

मोर्चाला अनेक पक्ष आणि संघटनांचा पाठींबा :-

या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसंग्राम पार्टी, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, रिपाइं ( आठवले) गट, बहुजन वंचित आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, एम आय एम, काँग्रेस पक्ष, दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, जनविकास आघाडी आदी संघटना सहभागी होत त्यांनी मोर्चाला पाठींबा दिला.

________________________

मोर्चात सर्व जाती धर्माचे नागरिक उपस्थित 

रिपाइंचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, प्रा हनुमंत भोसले, राकाँचे मुकुंद कणसे, छावाचे शिवाजी ठोंबरे, किसन कदम, शहराध्यक्ष भास्कर मस्के, गौतम बचुटे, बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगराध्यक्ष कबिरोद्दीन इनामदार, दलिल इनामदार, मुस्तफा कुरेशी , सुमित शिंदे, अझर इनामदार, संभाजी ब्रिगेडचे कैलास चाळक  , पप्पू भाई इनामदार , , बबलू इनामदार आदि कार्यकर्ते पदाधिकारी  उपस्थित होते .

________________________

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!