वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील साळेगांव येथे गोवंशीय पशुंना ग्रामपंचायतच्या वतीने मोफत लम्पी स्किन आजराची प्रतिबंधक लस देण्यात आली.
साळेगांव ता केज येथे दर गुरुवारी जनावरांचा आठवडी बाजार भरत असतो. सध्या गॊवंशीय प्राण्यात लम्पी स्किन या गंभीर आजाराची साथ सुरू आहे. हा आजार अत्यंत घातक आहे. त्यामुळे शुक्रवार दि. १६ सप्टेंबर रोजी साळेगांव ग्रामपंचतीच्या वतीने मोफत लसीकरण करण्यात आले. याचे उदघाटन सरपंच कैलास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच अमर मुळे, संजय इंगळे, पशु वैद्यकीय दवाखान्याचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. पांडुरंग गिरी, डॉ. डी. टी. जिरे, डॉ. संताजी शेलार तसेच भागवत इंगळे, दीपक राऊत, विश्वजित भांगे, अनिल साळुंके यांच्यासह पशु पालक सय्यद मंजूर, भागवत पवार, आदी पशुपालक उपस्थित होते.
दरम्यान साळेगांव पशु वैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात ६ हजाराच्या आसपास पशुधन असून साळेगांव येथे सुमारे ५०० गॊवंशीय पशुधन आहे. त्या सर्व गॊवंशीय पशुधन आहे. त्या सर्वांना ग्रामपंचायती मार्फत मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे आणि पशुधन पर्यवेक्षक डॉ. पांडुरंग गिरी यांनी दिली असून पशुपालकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!