आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक
यंदा कोणता जावई गाढवावर बसणार विड्यासह संपूर्ण जिल्हाभर चर्चा

दैनिक वादळवार्ता/विडा
केज तालुक्यातील विडा येथे धुलीवंदनाच्या दिवशी जावयाला गाढवावर बसवण्याची एक आगळीवेगळी परंपरा गेल्या शंभर वर्षांपासून विडेकर साजरी करतात परंतु मागील काही दिवसापासून विड्याचे जावई घर सोडून फरार झाले आहेत तर काहींनी आपले मोबाइल फोन बंद ठेवले आहेत विड्यात शंभर पेक्षा जास्त जावई आहेत यातील कोणाचा गदर्भ सवारीसाठी नंबर लागतो याची उत्सुकता सर्वाना लागली आहे जावई शोध घेण्यासाठी सर्वात जास्त प्रमाणात कसरत करावी लागते करण विड्याचे जावई म्हणलं की त्यांना आपली स्वतः चे गाव सोडून बाहेर गावी काही दिवसासाठी जावा लागते करण कधी विड्याचे मेव्हणे येतील आणि आम्हला पकडून नेतील या भीतीने या भीतीने आपअपली गावे सोडून पसार होतात ही परंपरा गेल्या संभार वर्षा पासून असून आतापर्यंत ९० पेक्षा जास्त जावई गाढवावरून मिरवले आहेत,ही परंपरा तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांचे लातूर चे जावई यांना प्रथम थट्टा मस्करीने धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावर बसून मिरवण्यात आले होते तेंव्हा पासून ही परंपरा अखंडपणे चालू आहे जावईला शोधून आणल्यावर त्याला एक दिवस अगोदर ग्रामपंचायत मध्ये सर्वांच्या नजर कैद मध्ये ठवले जाते व धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी ९ च्या सुमारास गाढव आणून गाढवाच्या गळ्यात चप्पल व बुटाचे हार घालून जावयाला त्यावर बसवून ढोल ताशे व डॉल्बीच्या तालावर गावभर मिरवणूक काढली जाते, ही मिरवणूक गावभर मिरवल्यास मिरवणुकिचा शेवट मारुती मंदिराच्या पारावर विसर्जित केली जाते मग होतो इथे जावयाचा मान पण पारावर सरपंच व गावकऱ्यांच्या हस्ते नवीन कपडे व सासरा काढून एक सोन्याची अंगठी घातले जाते या मिरवणुकीत कुठल्याही भेदभाव न करता सर्वांना एकत्रित घेऊन कार्यक्रम पार पडला जातो,
जावई आणण्यासाठी लढवावी लागते नामी शक्कल गेल्यावर्षी केज तालुक्यातील जवळबन युराज पटाईत याना मध्यरात्री १ च्या सुमारास सांगण्यात आले की काका उठा बाहेर खूप मोठा साप निघाला आहे पटकन बाहेर या असे खोटे बोलून त्यांना गाढव धिंडीचा मानकरी बनवलं होतं व अशा प्रकारे नामी शक्कल लढवावी लागते,हा कार्यक्रम सोमवारी २५ मार्च रोजी सकाळी होणार असून हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सरपंच सुरज पटाईत उपसरपंच सदाशिव वाघमारे, गोविंद देशमुख राजेभाऊ घोरपडे, महादेव पटाईत शहाजी घुटे, नारायण वाघमारे इत्यादीसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत
हा जावई मिरवणुकीचा कार्यक्रम सोमवारी २५ मार्च रोजी होणार असून जावई शोधण्यासाठी दोन ते तीन टीम तयार केल्या आहेत त्या टीम जावई शोधण्यासाठी आपल्या कामाला लागल्या असून विडेकराना जावई शोधण्यासाठी मोठे आव्हान आहे .
सरपंच सुरज पटाईत,विडा



