केज । प्रतिनिधी
पवनराजे इंग्लिश स्कूल तथा कै.राम चौरे प्राथ. माध्य. व उच्चमाध्यमिक विद्यालय केज येथे शिक्षक दिन मोठ्या हर्षउल्हासाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या बाबत वृत्त असे कि केज तालुकात तथा शहरामध्ये इंग्लिश माध्यमांची शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली पवनराजे इंग्लिश स्कूल केज येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधुन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळच्या सत्रामध्ये पवनराजे इंग्लिश स्कूल मधील इयत्ता १० वी चे विद्यार्थी शिक्षक दिनाचे प्रिन्सिंपल कु.भक्ति भांगे , चि.समर्थ चौरे, तसेच शिक्षक म्हणून कु.अंतिमा खंडेलवाल, कु.स्नेहल शिरसागर, कु.अंजली बनसोड,कु.पुजा घुले, कु.श्रुती ढाकणे,कु.श्रद्धा ढाकणे, कु.अश्विनी जाधव, चि.पंकज केदार,चि.राम केदार ,चि.धीरज पंडित,चि. अमरजित चौरे, चि.अनिकेत जाधव,यांनी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिन्सिंपल अशोक मस्के सर तर प्रमुख पाहुणे म्हणून घुले सर , दळवी मॅडम , ससाणे मॅडम,सपाटे मॅडम, कळसकर मॅडम ,सुहास काळे सर , सिद्धार्थ शिनगारे सर , विशाल सिरसट सर , घुले पाटील सर हे होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. शिक्षक दिनाचे महत्व व शिक्षक दिन का साजरा करावयाचा तसेच गुरु शिष्याचे नाते कसे असावे या संदर्भाने श्री.दळवे मॅडम यांनी आपल्या मनोगतात सांगीतले. तसेच घुले सर , घुले पाटील सर, अजय भांगे सर व इयत्ता दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय समारोहात पिन्सिंपल अशोक मस्के सर यांनी विद्यार्थी कसा असावा व शिक्षकांचे योगदान यावर आपले विचार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.अंतिमा खंडेलवाल हिने केले तर आभार कु.स्नेहल शिरसागर हिने मानले. सदरील कार्यक्रमास डि.एस. चौरे सर, चौरे मॅडम, राऊत सर, पारखे मॅडम, मुळे मॅडम , टेकाळे मॅडम ,केदार मॅडम, मदिहा मॅडम , सोनाली मॅडम आदि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तथा मोठया संख्येने विद्यार्थी उपास्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!