आपला बीड जिल्हाआपले केजविशेष

शेतकऱ्याच्या दोन्ही मुलांनी परिस्थितीवर मात करत गगनभरारी ; एकाची पोलीस सेवेत तर दुसर्‍याची अग्निशामक दलात निवड

शेतकरी कुटुंबातील मुलांची उंच भरारी

वादळवार्ता – केज

तालुक्यातील मौजे कोटी गावच्या शेतकरी कुटुंबातील दोन सख्या भावंडांची शासकीय सेवेत निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दादा महादेव डोंगरे यांची पोलीस सेवत तर व केशव महादेव डोंगरे यांची अग्निशामक दलात नुकतीच निवड झाली आहे.

      शेतकरी कुटुंबातील या दोन भावंडांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेहनतीच्या जोरावर शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न साकार करत वडिलांच्या कष्टाचे फळ केले.त्यांच्या या यशामागे वडील महादेव डोंगरे,आई कावेराबाई यांचा मोठा वाटा तर मोठा भाऊ अशोक डोंगरे यांचे विशेष प्रयत्न यांच्या निवडीसाठी झालेले आहेत.

     दोघांच्या या निवडीबद्दल गावकऱ्यांच्या वतीने जंगी सत्कार सत्कार करण्यात आला. एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ शासकीय सेवेत लागल्याने कोटी गावची मान उंचावली असल्याचे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार कार्यक्रमाच्या वेळी सांगण्यात आले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!