केज पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांची कारवाई
२ कोटी १८ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त
६० गोण्यामध्ये १२३५.५ कि.ग्रॅम चंदन जप्त
दैनिक वादळ वार्ता/ केज
दिनांक ०५/०५/२०२४ रोजी पहाटे ०४.३० ते ०५.१५ वाजता च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांना गुप्त बातमीदारां मार्फत माहिती मिळाली की, एक आयशर वाहन हे तोडलेल्या चंदनाच्या झाडाची वाहतुक करीत असुन ते केज कडुन धारुरकडे जाणार आहे . अशी गोपणीनय माहिती मिळाल्याने पोलीस ठाणे केज व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे स्टाफ धारुर रोडने धारुरकडे जात असतांना नेहरकर यांचे पेट्रोलपंपासमोर एक आयशर क्रमांक MH.24.AU.9383 हा उभा असल्याचे आढळुन आले. सदर पथकाने सदर वाहनाच्या चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रियतम काशिनाथ साखरे वय ३४, रा. गुरुवारपेठ अंबाजोगाई ता अंबाजोगाई व सोबतचा इसम नामे शंकर पंढरी राख, रा. कौडगाव ता केज, जि. बीड असे नाव सांगितले. सदर वाहनाच्या चालकास विश्वासात घेवुन वाहनात काय आहे बाबत विचारले असता चालकाने वाहनात रिकामे कॅरेट असुन त्याच्यापुढे चंदनाच्या झाडाच्या गाभ्याची लाकडे असल्याचे सांगितले. चोरीच्या चंदनाची लाकडे ही बालासाहेब दत्तात्रय उर्फ बालाजी जाधव, रा. केज यांचे मालकीचे असुन त्यांचे सांगणे प्रमाणे सदरची लाकडे जालन्याकडे घेवुन जात असल्याचे सांगितले. सदर वाहनात पुढच्या साईडला चंदनाच्या झाडाचा गाभा ठेवण्यासाठी पुष्पा स्टाईल एक चोर कप्पा असुन त्यात चंदनाच्या झाडाचा गाभ्याने भरलेल्या गोण्या असुन पाठीमागील बाजुस भाजीपाल्याचे प्लॅस्टीकचे कॅरेट ठेवले होते. सदर वाहनातुन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन साहेब यांचे समक्ष ६० चंदनाचा गाभा भरलेल्या गोण्या काढुन दिल्या. त्याचे एकुण वजन १२३५.५ कि.ग्रॅम किंमती १,९७,६८,०००असे मिळुन आले आहे. सदर कारवाईत एकुण २,१८,३१,००० किंमतीचा मुद्देमाल आशयर टैम्पोहस जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत पोलीस स्टेशन केज येथे स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पोलीस स्टेशन केज येथे गुरनं २४४/२०२४ कलम ३७९,३४ भाविसह कलम भारतीय वन अधि. ४१,४२ कलम महाराष्ट्रवन अधिनियम २६ (फ) प्रमाणे ३ आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर चोरीच्या चंदनाच्या झाडाचा मालक बालासाहेब दत्तात्रय उर्फ बालाजी जाधव, रा. केज याचेविरुध्द यापुर्वी बर्दापुर पोलीस स्टेशन गुरनं. ११५/२०२२ अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरनं १७/२०२२ गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकुर साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके मॅडम, मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज कमलेश मीना साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोउपनि राजेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक गणेश मुंडे, सफौ जायभाय, सफौखेडकर, पोह/निसार शेख, पोह/तुषार गायकवाड, पोह/भागवत शेलार, पोह/कैलास ठोंबरे, पोलीस स्टेशन केज येथील पोना/दिलीप गित्ते, पोअं/मतीन शेख पोअ/शिवाजी कागदे, पोअं/संतोष गित्ते, पोअं/महादेव बहिरवाळ, पोअं/प्रकाश मुडे यांनी महत्वाची कामगिरी केलेली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!