आपला बीड जिल्हाआपले केज

भिंत अंगावर कोसळुन मजुराचा दुर्दैवी मृत्यु 

वादळवार्ता – केज

केज शहरामध्ये अतिशय दुःखद घटना घडली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत माहिती अशी कि केज शहरामध्ये रोजा मोहल्ला दर्गाच्या पाठीमागे वास्तव्यास असणारे शेख नबी शेख लाला हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मोलमजुरी करुण करत होते. त्यांच्या कुटुंबात दोन मुले तीन मुली असा त्यांचा परिवार होता. आज दि २४ मे रोजी ते राजीव गांधी उर्दु शाळेच्या समोर मजुरीने घराची जुनी भिंत पाडण्यासाठी गेले असता दुपारी २.३० ते ३.०० च्या दरम्यान घराची भिंत त्याच्या अंगावर कोसळली असता त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता जास्त दुखापत असल्याने त्यांना स्वराती रुग्णालय अंबाजोगाई येथे हलविण्यात आल्यानंतर  उपचारादरम्यान त्यांचा सायं ५ वाजता मृत्यु झाला.

या घटनेमुळे केज शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!