आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

कत्तलीसाठी जाणाऱ्या बारा बैलांची सुटका ; पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई : १२ लाखाचा मुद्देमाल ताब्यात

वादळवार्ता – गौतम बचुटे

कत्तलीसाठी कत्तलखान्याकडे जात असलेला बैलांचा टेम्पो अडवून त्यातील बारा बैलांची सुटका उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांच्या पथकाने सुटका केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. १ एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस पंकज कुमावत यांना एका खबऱ्या मार्फत अशी माहिती मिळाली की, नेकनूर येथून टेम्पोत बैल भरून तो केज मार्गे कत्तलखान्याकडे जात आहे ही माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी त्यांच्या पथकाला कारचाईचे आदेश दिले.
आदेश मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, बालाजी दराडे, संजय टुले आणि राजू वंजारे यांनी सकाळी ९:३० वा केज येथील धारूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर भवानी चौकात सापळा लावून आयशर टेम्पो क्र (एम एच-२३/यु-०६६९) अडवला. त्याची तपासणी केली असता त्या मध्ये १२ गोवंशीय बैलांची क्रूरतेने व निर्दयीपणे वाहतूक करण्यात येत होती. ते बैल अंबाजोगाई मार्गे उदगीर येथील कत्तलन्याकडे घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.
त्या नंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुकुंद ढाकणे यांच्या फिर्यादी वरून वाहनचालक अरबाज जलाल पठाण, क्लिनर रेहान जाकेर कुरेशी आणि शौकत बाबा कुरेशी यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनीयम १९६० चे कलम ११ (१) (डी), ११ (१) (ई) सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनीयम १९७६ चे कलम ५ (ए) (१) , ५(२), ११ सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बैलांची सुटका करण्यात आली आहे

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!