शेतातील कामासाठी गेलेले शेतकरी आणि शेतमजूर शेतातच पडले अडकुन!
महादेव काळे/ वादळवार्ता, प्रतिनिधी
रिमझिम पावसानंतर वरुनराजाने काही दिवस विश्रांती घेतली होती. तशी पिके बहारदार आल्याने शेतकरी राजाही आनंदात होता. परंतु पाऊस पडत नसल्याने तो चिंतेत असायचा आज या पिकाला पावसाची अत्यंत गरज होती. ऐन याच समयी आज दि. ७ रविवार दुपारी ३:३० वा. अचानक आभाळभरुन आले आणि विजांच्या कडकडटासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाउस होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दि.७ ऑगस्ट २०२२ रविवार रोजी केज तालुक्यातील नांदुरघाट सर्कल मधील शिरुरघाट, नाव्होली, दैठणा, राजेगांव, माळेवाडी यासह चिंचोलीमाळी सर्कल मधील देखील वरपगांव, ऊ.पिंप्री, बोरगाव, कापरेवाडी आदि ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सध्या जोरदार पाऊस सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत देखील हा पाउस सुरुच होता.
कामासाठी शेतावर गेलेल्या शेतकरी व शेतमजूर आणि पशु यांना पावसाने झोडपून काढले आहे.या पावसात शेतातुन घराकडे येणे शक्य नसल्याने अनेकजण पशुधनासह शेतातच अडकून पडले आहेत.
मात्र शेतकरी राजा या पावसामुळे पुरता आनंदीत झाला असुन हा पाऊस या खरिप पिकासाठी वरदान ठरला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!