बीड । प्रतिनिधी
जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने ओढे, नदी, तलाव ओसंडून वाहत आहेत. ३१ ऑगस्ट रोजी रात्री सुरुवात झालेला मध्यम पाऊस दिवसभर पडल्याने रविवारी बीड शहराजवळ बिंदुसरा तलाव १००% भरला असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. अंकुश नगर भागातील करपरा नदी देखील ओसंडून वाहत आहे, आज दिनाक 2 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या भागतील नागरिक करपरा नदी कडे पाणी पाहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्यात एक पुरुष जातीचा मृतदेह वाहून आलेला दिसल्याने तात्काळ नागरिकांनी शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती दिली असता तात्काळ पोलिसांनी अंकुश नगर भागातील नदीमध्ये घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला सदरील मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!