वादळवार्ता प्रतिनिधी – महादेव काळे
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन व श्री संस्कार इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी हातात विणा, टाळ, मृदंग,पताका घेऊन वैष्णवांचा मेळा संतांच्या, वारकऱ्यांच्या व विठु माऊलीच्या रुपात विद्यार्थ्यांच्या वेशभूषेतून पंढरीची वारी दिंडी नगर प्रदक्षिणा घालून काढण्यात आली.
संतांचे आचार-विचार त्याचे संस्कार मानवतेचा संदेश समाजात रुजवण्यासाठी या वारीच्या निमित्ताने हा उपक्रम श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन व इंग्लिश स्कूलच्या वतीने घेण्यात आला.
संपुर्ण गावात नगरप्रदक्षिणा घालून गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन तेथे विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेण्यात आले. गावातील संत नामदेव महाराज मंदिरात मुख्य पारावर विद्यार्थ्यांनी फेरा धरून मृदंगाच्या, टाळाच्या आणि विण्याच्या सुरमई ध्वनीमध्ये अभंग गायन करून आनंदाचे वातावरण आणि वैष्णवांच्या मेळाव्याचे स्वरूप प्राप्त केले.
यावेळी श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन व इंग्लिश स्कूलचे संचालक अनिल गलांडे, चंद्रकांत भुजबळ, ह.भ.प. अबा महाराज मेहरकर, ह.भ.प. विष्णू महाराज राऊत, रविकुमार गायकवाड, जालींदर गलांडे, अमोल गलांडे, रामराजे गलांडे, शिक्षीका, निलम पवार यांनी नियोजन केले.
दिंडीमध्ये विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या विशेष उपक्रमाबद्दल गावातील नागरिकांनी संचालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!