खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक : अद्याप शव विच्छेदन झालेले नाही
वादळवार्ता – गौतम बचुटे
केज तालुक्यातील डोका येथील एका २५ वर्षीय महिलेचा डोका येथील विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी तिच्या आई वडिलांकडील नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्या शिवाय प्रेताचे शव विच्छेदन करन्यास नकार दिला असून नातेवाईकांत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
केज तालुक्यातील डोका (हादगाव) येथे दि. ४ मे रोजी वर्षा नावाच्या एका वाशीम जिल्ह्यातील महिला पाण्यात बुडवून मृत्यू झाला होता. ही वर्षा नावाची महिला ही सुशेन भांगे त्यांच्याशी प्रेम जुळल्याने त्याच्या सोबत राहत होती. त्या प्रकरणी वर्षा हिच्या नातेवाईकांनी तिचा खून झाला असल्याचा आरोप केला असून जो पर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही; तो पर्यंत आम्ही प्रेताचे शव विच्छेदन होऊ देणार नाही आणि प्रेत ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!