आपला बीड जिल्हा

बीड जिल्हयाला बाल विवाह निर्मुलनासाठी प्रतिष्ठित ‘स्कॉच’ चा पुरस्कार प्रदान

तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी स्वीकारला पुरस्कार

बीड।प्रतिनिधी

बीड जिल्हयाने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा चा “स्कॉच 2024 राष्ट्रीय पुरस्कार” बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना आज प्रदान करण्यात आला.  विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार संस्था प्रदान करीत असते. श्रीमती दीपा मुधोळ मुंडे बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात बीड जिल्हयात बाल विवाह रोखण्यासाठी विविध पाऊले उचलण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून या काळात होणारे आणि होत असलेले बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले. याचीच पोच पावती म्हणुन स्कॉच या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने या कामाची दखल घेत बीड जिल्हयाची बाल विवाह निर्मुलनासाठी निवड केली गेली होती.

 राजधानी नवी दिल्ली येथे 99 व्या स्कॉच परिषदेनिमित्त इंडिया हॅबिटाईट सेंटरच्या सिल्वर ओक सभागृहामध्ये एका शानदार समारंभात त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

बालविवाह निर्मूलनासाठी बीड जिल्ह्याने राबविलेल्या अभिनव उपाययोजना : दीपा मुधोळ मुंडे : बीड जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमुख कारण म्हणजे उसतोड कामगाराची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच हुंडा प्रथा, बाल लिंग गुणोत्तर, गरिबी, जुन्या चाली रूढी या समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे बाल विवाह रोखणे तसेच जन जागृती करणे या बाबत बीड जिल्ह्यात तत्कालीन जिल्ह्याधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी विशेष मोहीम हाती घेतले असल्याचे सांगीतले.जिल्ह्यात वर्ष 2021 पासून विवाह निर्मूलन युनिसेफ, एस बी सी 3 चाईल्ड लाईन बोर्ड, बाल कल्याण समिती बीड, सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्था आणि प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 राबविण्यासाठी विविध उपाय योजना सुरु केल्या. बाल विवाह निर्मूलन या विषयावर जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबत दर महा जिल्हा कृती दल बैठक आखली. याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शाळा कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत येथे दर्शनीय भागात चाईल्ड हेल्प लाईन 1098 चा लोगो पेंट करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समित्यांचे नव्याने स्थपना करण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तालुका बाल संरक्षण समित्या अद्यावत करण्यात आल्या. जिल्ह्यातील शिक्षक, केंद्र प्रमुख, अंगणवाडी सेविका आशा सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, व ग्रामसेवक असे एकूण 4751 कर्मचा-यांची कार्यशाळा घेतल्या. किशोर वयीन मुलामुलींची बाल विवाह संदर्भात जनजागृतीचे कार्यक्रम आखले. 514 केंद्र प्रमुख व बाल रक्षक शिक्षक अंगणवाडी पर्यवेक्षिका व ग्राम सेवक, गट प्रवर्तक पोलीस कर्मचारी शिक्षण विभागाचे कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आले.जिल्हा महिला व बाल विकास, युनिसेफ, एसबीसी 3 व युवा ग्राम विकास मंडळ केज यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 125 माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा परिषद शाळेतील 7313 मुली व 6562 मुले असे एकूण 13875 यांचे जन जागृतीचे कार्यक्रम घेतले.जिल्ह्यात 125 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील किशोर वयीन मुला मुलीच्या पालकांना :पालक संवेदना’ कार्यक्रम राबवून 13875 पाल्याचे व 5130 पालकांचे बाल विवाह जन जागृती केली.सक्षम युवा शक्ती कार्यक्रमातर्गत बीड जिल्ह्यातील 21 महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी रायमोहा (शिरूर कासार) अमळनेर (पाटोदा) व कडा (आष्टी) या ठिकाणी बाल विवाह जन जागृती अनुषंगाने पथनाट्य खेळ व गाण्याचे माध्यमातून 5 हजार पेक्षा अधिक लोकापर्यंत संदेश पोहचविण्यात आला.15 ऑगस्ट 2023 रोजी ३८०० मुलांची बीड जिल्ह्यात जन जागृती रली काढण्यात आली.बाल विवाह निर्मुलन विषयक कामकाजात मदत करण्यसाठी जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये 63 ” नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दर सोमवारी बालविवाह निर्मुलन विषयी प्रतिज्ञा घेतली जाते. 15 ऑगस्ट व 2 ऑक्टोबर रोजी गावात होणा-या ग्राम सभेत बाल विवाह मुक्त ग्रामपंचायत या बाबत ठराव घेण्यात येत आहेत.

बाल विवाह मुक्त बीड या मोहिमेमुळे बीड जिल्ह्यात झालेले परिणाम : चाइल्ड हेल्पलाइन 1098 या क्रमांकाचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जन जागरण झाल्याने एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2024 अखेर १८२ बाल विवाह थांबवून 03 प्रकरणात बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006 अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.वर्ष 22-23मध्ये 132 , वर्ष 23-24 मध्ये 255 बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे अशी प्रतिक्रिया दीपा मुदळ मुंडे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.

बाल विवाह करणे/लावणे व त्यास प्रोत्साहन देणे हा कायद्याने गुन्हा आहे बाल विवाहाची बोलणी करणे, मुलगी पाहणे, यादी करणे, साखरपुडा करणे, कुंकू टिळा करणे, हळदी कार्यक्रम करणे, हे सुद्धा कायद्याने गुन्हाच आहे.

बाल विवाह लावल्यास गुन्हा कोणावर नोंदविला जातो :नवरा मुलगा, मुलाचे मुलीचे आई-वडील, मुलाचे मुलीचे मामा-मामी, आज्जी आजोबा, विवाह सोहळ्यास उपस्थिती इतर सर्व नातेवाईक, वन्हाडी मंडळी, मंगल कार्यालय वाले, मंडपवाले, आचारी, बाजेवले, फोटोग्राफर, भटजी, पाणी वाले, डीजेवाले, घोडेवाला, व लग्न लावण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे सर्व व्यक्ती. यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, या सर्वांबाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यामुळेच बालविवाह थांबवण्यास यश आले. ज्यांचे बालविवाह थांबवले त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि भविष्यातील त्यांना भेडसावणाऱ्या समस्या थांबविण्यात प्रशासनाला अंशतः का होईना यश आले. आजच्या स्कॉच चा मिळालेला पुरस्कार केलेल्या कामांची पोचपावती आहे, याचा विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया पुरस्कार प्राप्तीनंतर दीपा मुधोळ मुंडे यांनी व्यक्त केली.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!