वादळवार्ता – केज
शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित केज ची निवडणूक मोठ्या अटीतटीच्या परिस्थितीत झाली यामधे पतसंस्था विकास पॕनलला आठ जागेवर विजय मिळाला तर पतसंस्था बचाव पॕनलला सात जागा मिळाल्या होत्या परंतु रमेश आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पॕनलने बाजी मारली व कल्याण काळे चेअरमन पदी नऊ मते विजय मिळवला तर संजय गलांडे यांची सचिव पदावर निवड झाली . 
शिक्षक पतसंस्था बचाव पॕनलला सात जागा मिळवून देखील रमेश आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पॕनलने दणदणीत विजय मिळवत पतसंस्थेवर वर्चस्व मिळवले . मंगळवार दि २८ रोजी शिक्षक पत संस्था निवडणूक मधे चेअरमन निवडीत जादुची कांडी फिरली व बचाव पॕनलला दोन मते वळवण्यात यश आले व कल्याण काळे यांचा चेअरमन पदावर दणदणीत विजय झाला .कल्याण काळे यांना नऊ व स्वाती शेप यांना सहा मते मिळाली उपाध्यक्ष पदी अंकुशे विकास पॕनलचे यांची बिनविरोध निवड झाली तर बचाव पॕनलचे संजय गलांडे यांची सचिव पदी नऊ मते व श्रीराम देशमुख यांची सहा मते घेऊन गलांडे यांची निवड झाली खजिनदार पदी
किशोर भालेराव यांची संतोष मोराळेवर मात देऊन निवड झाली . भाजप नेते रमेश आडसकर यांच्या मार्गदर्शना खाली सर्व शिक्षक पतसंस्था बचाव पॕनलने बाजी मारून विजय मिळवला .
निवडणूक निर्णय अधिकारी मोटे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुटे यांनी निवड जाहीर केली सर्व संचालक व नवनिर्विचित पदाधिकारी यांचा आडसकर यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला यावेळी नेतृत्व करणारे दत्ता धस , अरूण धपाटे , राम जोगदंड , यांच्या सह पॕनल प्रमुख लक्ष्मण घुले , उजगरे सर , आगे सर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!