केज । प्रतिनिधी
केज येथील पवनराजे इंग्लिश स्कूल या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच घेण्यात आलेल्या जी चॅम्प ॲबॅकस नॅशनल २०२५ परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शालेय स्तरावर बुद्धिमत्ता, गणितीय कौशल्य आणि एकाग्रता वाढवणाऱ्या या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे स्थान पटकावले. त्यामध्ये कु. अराध्या अमर खाडे सुपरस्टार ठरली तर , शिवप्रसाद लांडगे , कु.श्रावणी सुग्रीव धस , कु.स्वरा संजय मुळे, कु. गुंजन विष्णु गायकवाड , कु. सृष्टी केशव बच्छाव यांनी सुयश प्राप्त केले आहे. यांना यशस्वी शिक्षण देण्याचे कार्य श्री. दळवी मॅडम यांनी केले.शाळेच्या मुख्याध्यापक अशोक मस्के यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी मेहनतीने अभ्यास करून हे यश मिळवले आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचा पाठिंबा यामुळे हे शक्य झाले.”
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, शिक्षकवर्ग, पालक आणि परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यात आणखी मोठ्या स्तरावर विजय मिळवावा अशी शुभेच्छा दिल्या आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!