चेअरमनपदी उत्तम काकडे तर व्हाईस चेरमनपदी अरुण नाईकनवरे
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
राजकारणात अनेकांना चारीमुंड्याचीत करून हाबाडा देणारे भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी केज तालुक्यातील साबला सेवा सहकारी सोसायटी ताब्यात घेतली आहे. चेअरमनपदी उत्तम काकडे तर व्हाईस चेरमनपदी अरुण नाईकनवरे यांची निवड झाली आहे.

केज तालुक्यातील साबला सेवा सहकारी सोसायटीत भाजपने नेत्या पंकजाताई मुंडे आणि रमेशराव आडसकर यांच्या उत्तरेश्वर महाराज जनविकास पॅनलचे नऊ संचालक निवडून आले आहेत. चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन पदाच्या झालेल्या निवडीत उत्तम दत्तोबाव काकडे यांची चेअरमन व पदी अरुण तुकाराम नाईकनवरे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे.
साबला सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि भाजप नेते रमेशरावजी आडसकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उत्तम काकडे अरुण नाईकनवरे, राहुल सरवदे, आत्माराम काकडे, बन्सी काकडे, खैराती जमालोद्दीन काजी, सदाशिव काकडे, दैवशाला मुळे आणि उजनावती काकडे हे नऊ सदस्य निवडून आले आहेत.
आज झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमनच्या निवडीत उत्तम काकडे यांची चेअरमनपदी तर अरुण नाईकनवरे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडी नंतर कार्यकर्त्यांनी प्रचंड मिरवणूक काढीत गुलालाची उधळण करून जल्लोष केला.
यावेळी आडसकर समर्थक कार्यकर्ते मधुकर काकडे, दत्तूकुमार काकडे, महादेव कटारे, बाबू कटारे, अंकुश मुळे, पांडुरंग काकडे, अभिमान नाईकनवरे, मधुकर नाईकनवरे, सोपान नाईकनवरे, शाहू राऊत, संतोष नाईकनवरे, कपिल नाईकनवरे, शिवशंकर नाईकनवरे, हनुमंत काकडे, आकाश काकडे, सचिन मुळे, सतीश नाईकनवरे, संदीप काकडे, बालाजी काकडे, आश्रुबा नाईकनवरे, अमोल काकडे, गणेश मुळे, निहाल काझी, सावताराम नाईकनवरे, रोहिदास कटारे, वचिष्ट नाईकनवरे, रंगनाथ नाईकनवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान नवनिर्वाचित चेअरमन उत्तम काकडे आणि व्हाईस चेअरमन अरुण नाईक नवरे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे भाजपाचे नेते रमेशरावजी आडसकर यांनी अभिनंदन केले आहे.