आपला बीड जिल्हाआरोग्य

हरि ओम हॉस्पिटल केजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबीराचे केज येथे आयोजन !

गरजवंतानी आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा – डॉ. विजयकुमार मोराळे

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

केज येथील हरि ओम हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिन तसेच दिपावलीच्या, पाडव्याचे औचित्य साधुन डॉ. विजयकुमार मोराळे व डॉ. स्वाती विजयकुमार मोराळे यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबाराचे आयोजन केले आहे.

सविस्तर वृत्त असे कि केज येथील प्रसिद्ध फॅमिली फिजीशीयन व जनरल तज्ञ डॉ. विजयकुमार मोराळे तसेच फॅमिली फिजिशीयन व स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्वाती मोराळे यांचे केज येथील संत भगवानबाबा चौक कानडी रोड केज येथील हरि ओम हॉस्पीटलच्या प्रथम वर्धापन दिन तसेच दिपावली , पाडव्याच्या निमित्ताने भव्य आरोग्य शिबीराचे दि 26 अक्टोबंर वार बुधवार रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे.

सदरील शिबीरामध्ये डॉ. श्रीकृष्ण गित्ते (हृदयविकार, मधुमेह, किडनी विकार तज्ञ ) तसेच डॉ. आशुतोष चाटे ( त्वचारोग तज्ञ ) हे उपस्थित राहणार असुन जास्तीत जास्त गरजवंतानी उपस्थित राहुन या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन हरि ओम हॉस्पीटल चे डॉ. विजकुमार मोराळे व डॉ. स्वाती मोराळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!