वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
दिव्यांग आणि निराधार व्यक्तींसाठी भगवान श्रीकृष्ण आश्रम केज येथे प्रवचनकार भागवत भूषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांनी विविध जीवनावश्यक वस्तू आणि त्या नंतर फराळ वाटप करण्यात येणार आहे.

प्रवचनकार भागवत भूषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांच्या केज येथील भगवान श्रीकृण मठात दि. २७ ऑक्टोबर रोजी आनंदी दिपावली महोत्सवा अंतर्गत अपंग, दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तु भेट देऊन त्यांना गोडधोड फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
तरी या कार्यक्रमाला आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाला गरजू आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थितर राहण्याचे आवाहन केशव महाराज शास्त्री आणि दत्तात्रय धस यांनी केले आहे.