वादळवार्ता वार्तांकन
भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते .विवीधतेतुन एकता आणी सण समारंभाच्या माध्यमातून आपली जीवनशैली प्रगल्भ होते .मागील आठवड्यात आलेल्या गणरायाचे स्वागत सर्व समाज बांधवांनी केले तसेच गणरायाच्या आगमनाचे स्वागत वरुणराजानेही केले .
वरुणराजाच्या आगमनाने बळीराजाही सुखावला असुन खरीप पिकाला जिवदान मिळाले आहे. त्यामुळे यावर्षी महालक्ष्मी तथा जेष्ठागौरीचे आगमन शनीवार दि.०३ रोजी स्वागत करण्यात आले.
रवीवारी महालक्ष्मीला पुरणपोळी व पंच पक्वानाचा नैवेद्य दाखविण्यात आला.यावेळी आकर्षक रोषणाईने महालक्ष्मीचे मखर सजविण्यात आले होते .महीलांनी औक्षवण करुन हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेऊन महीलांनी वेगवेगळे खेळ खेळुन आनंद द्विगुणीत केला .
यावर्षी कोरोना महामारीचे संकट टळल्यामुळे मोठ्या उत्साहाने गौरी गणपतीचे आगमन उत्साहाने करण्यात आले आहे.तसेच व्यापारी वर्गही व्यवसाय चांगला झाला असल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!